सुरगाण्यात अवैद्य मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:56 PM2018-11-30T12:56:49+5:302018-11-30T12:57:11+5:30
पेठ - स्थानिक गुन्हा शाखा नासिक ग्रामिण यांनी केलेल्या कारवाईत ३३,६०० रूपये किमतीच्या दमण बनावटीच्या व्हिस्कीच्या बाटल्यांसह २,३३,६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पेठ - स्थानिक गुन्हा शाखा नासिक ग्रामिण यांनी केलेल्या कारवाईत ३३,६०० रूपये किमतीच्या दमण बनावटीच्या व्हिस्कीच्या बाटल्यांसह २,३३,६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त मुद्देमाल सुरगाणा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असुन अज्ञात चालकाविरु ध्द गुन्हा नोद करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पथक पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीवर असतांना निरीक्षक अशोक कर्पे यांना सुरगाणा बस स्टॅण्डच्या पुर्व बाजुकडुन एक इंडीका कार क्र . एम. एच. १५- बी.डी. ४७९४ मध्ये अवैध मद्यसाठा असल्याचे मिळालेल्या माहितीवरु न पथकाने सहाय्यक उपनिरीक्षक आर. एच मुंढे यांच्या पथकाने तपासणी केली असता त्या वाहनात महाराष्ट्र राज्यात विक्र ीवर बंदी असलेली दमण बनावटीची जॉन मार्टीन प्रिमियम व्हिस्कीच्या १८० मिलीच्या बाटलीत असलेली सात बॉक्स आढळुन आली प्रत्येक बॉक्समध्ये ४८ बाटल्या आहेत त्याची बाजारभावाप्रमाणे अंदाजे किंमत ३३,६०० रूपये इतकी आहे हा मद्यसाठा चोरट्या रितीने विक्र ी करण्याच्या उद्देशाने आणण्यात आला होता. परंतु त्या कारच्या चालकाचे नाव गाव माहित नसल्याने तो मद्यसाठा इंडीका कारसह जप्त करण्यात येऊन सुरगाणा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला असुन पोलीस ठाण्यात प्रोव्हिबिशन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस हवालदार शिरोळे, महाले, सुर्यवंशी, तुपलोंढे, पोलीस नाईक वसंत खांडवी, चालक काकडे यांचा सहभाग होता.