बाधित रुग्णसंख्या पुन्हा दोनशेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:17 AM2021-02-16T04:17:34+5:302021-02-16T04:17:34+5:30
नाशिक : जिल्ह्यातील बाधितांच्या रुग्णसंख्येत पुन्हा काहीशी वाढ दिसत असून सुमारे महिनाभरानंतर पुन्हा बाधित संख्या दोनशेहून अधिक अर्थात २०४ ...
नाशिक : जिल्ह्यातील बाधितांच्या रुग्णसंख्येत पुन्हा काहीशी वाढ दिसत असून सुमारे महिनाभरानंतर पुन्हा बाधित संख्या दोनशेहून अधिक अर्थात २०४ वर पोहोचली. तर, २०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, सोमवारी नाशिक शहर आणि ग्रामीणला प्रत्येकी एक याप्रमाणे दोघांचे निधन झाल्याने एकूण मृतांची संख्या २०७३ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख १८ हजार ३५३ वर पोहोचली असून, त्यातील एक लाख १५ हजार ४६ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १,२३४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९७.१६ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.८४, नाशिक ग्रामीण ९६.२१, मालेगाव शहरात ९२.७९, तर जिल्हाबाह्य ९४.०८ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख १९ हजार २९४ असून, त्यातील चार लाख ४९६ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख १८ हजार ३५३ रुग्ण बाधित आढळून आले असून, ४४५ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.