कोरोनामुक्तच्या तुलनेत बाधित रुग्ण दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 01:20 AM2021-12-13T01:20:10+5:302021-12-13T01:20:29+5:30
जिल्ह्यात प्रदीर्घ कालावधीनंतर बाधित नागरिकांच्या तुलनेत कोरोनामुक्त दुप्पटहून अधिक असल्याची नोंद रविवारी (दि.१२) झाली. कोरोनामुक्त २२, तर बाधित रुग्णसंख्या ४८ वर पोहोचली आहे.
नाशिक : जिल्ह्यात प्रदीर्घ कालावधीनंतर बाधित नागरिकांच्या तुलनेत कोरोनामुक्त दुप्पटहून अधिक असल्याची नोंद रविवारी (दि.१२) झाली. कोरोनामुक्त २२, तर बाधित रुग्णसंख्या ४८ वर पोहोचली आहे.
दिवसभरात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ८७३७ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील कोरोना उपचारार्थींची संख्या ३३४ असून, कोरोना प्रलंबित अहवालांची संख्या २७७ पर्यंत खाली आली आहे. शनिवारपर्यंत प्रलंबित अहवालसंख्या दोन हजारांच्या आसपास असल्याने रविवारी अहवाल प्राप्त झालेल्या अहवालातून अधिक बाधित आढळून आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ९७.८० टक्क्यांवर पोहोचले आहे.