दोडी बुद्रुकमधील एकास कोरोनाचा संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 10:21 PM2020-06-07T22:21:16+5:302020-06-08T00:29:11+5:30
दोडी बुद्रुक येथील ५८ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. सदर रुग्णावर संगमनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलाचा अपघात झाला म्हणून त्यास भेटण्यासाठी मुंबई येथे प्रवास केल्याची रुग्णाची हिस्ट्री आहे.
सिन्नर : दोडी बुद्रुक येथील ५८ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. सदर रुग्णावर संगमनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलाचा अपघात झाला म्हणून त्यास भेटण्यासाठी मुंबई येथे प्रवास केल्याची रुग्णाची हिस्ट्री आहे.
मुंबईहून परतल्यानंतर रुग्ण आजारी पडला होता. त्याने सिन्नर, दोडी बुद्रुक व नांदूरशिंगोटे येथील खासगी डॉक्टरांकडे उपचार करून घेतले. तरीही त्यांना बरे वाटत नसल्याने संगमनेर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यांच्या घशाच्या स्रावाचे नमुने घेतल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. तहसीलदार राहुल कोताडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी दोडी बुद्रुक येथे जाऊन माहिती घेतली. दोडी बुद्रुक गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून तीन डॉक्टरांसह रुग्णाच्या सहा निकटवर्तीयांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तर चार जणांना घरातच विलगीकरण केले आहे.