शहरात दूषित पाण्याचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:34 AM2019-06-03T00:34:11+5:302019-06-03T00:34:46+5:30
शहरासह संपूर्ण भागात पाण्याची टंचाई जाणवत असताना सिडको भागात मात्र पाणीपुरवठा मुबलक होत असला तरी महापालिकेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे गणेश चौकासह परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बहुतांशी नागरिकांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्यामुळे लहान बालकांसह मोठ्यांनादेखील पोटदुखी, उलट्या होत असल्याने महिलावर्गात तीव्र संतापाची लाट पसरली असून, नागरिक मनपाच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.
सिडको : शहरासह संपूर्ण भागात पाण्याची टंचाई जाणवत असताना सिडको भागात मात्र पाणीपुरवठा मुबलक होत असला तरी महापालिकेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे गणेश चौकासह परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बहुतांशी नागरिकांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्यामुळे लहान बालकांसह मोठ्यांनादेखील पोटदुखी, उलट्या होत असल्याने महिलावर्गात तीव्र संतापाची लाट पसरली असून, नागरिक मनपाच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.
महापालिकेच्या वतीने सिडकोतील संपूर्ण प्रभाग क्रमांक २४ तसेच पाथर्डी फाट्यापासून ते अश्विननगर, मोरवाडी, पेलिकन पार्क परिसर, स्टेट बॅँक परिसर, दत्त चौक या भागाला गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून मुकणे धरणातून पाणीपुरवठा होत आहे. उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने जलवाहिनी फुटणे किंवा तत्सम प्रकार होतात आणि गटारीचे पाणी जलवाहिनीत मिसळते. तथापि, हे ज्ञात असूनही प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची पूर्वदक्षता घेतली जात नाही. मध्यंतरी दत्तनगर परिसरात पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागला. हे पाणीदेखील दूषित असल्याची तक्रार होती.
सिडको भागातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून गंगापूर धरणातून पाणीपुरवठा होत होता. परंतु मनपाच्या वतीने यात भर म्हणून सिडकोवासीयांसाठी मुकणे धरणातून थेट पाइपलाइन टाकून पाणीपुरवठा होत आहे. यातील पहिला टप्पा हा सिडकोतील संपूर्ण प्रभाग क्रमांक २४ तसेच पाथर्डी फाट्यासह अश्विननगर व परिसरात पाणीपुरवठा केला जात आहे.
नियोजन विस्कळीत
सिडकोला शिवाजीनगर जलकुंभ तसेच आता मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परिसरात पाणीपुरवठा वाढला असला तरी प्रशासनाचे नियोजन चुकत असून, त्यामुळेच मुबलक पाणी असतानाही अपुरा तसेच दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, चौकशीची मागणी केली आहे.
सिन्नर फाटाही बाधित
नाशिकरोड : सिन्नर फाटा स्टेशनवाडी भागामध्ये जुन्या व नवीन पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनमध्ये दूषित पाणी मिसळत असल्याने रहिवाशांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मनपा पाणीपुरवठा विभाग दूषित पाणी मिसळण्याचे ठिकाण शोधण्यासाठी झटत आहे.
सिन्नरफाटा स्टेशनवाडी भागातील विष्णूनगर व गोदरेजवाडी येथे मनपाची जुनी व नवीन पाण्याची पाइपलाइन आहे. पाण्याच्या पाइपलाइन जवळच गटारी असून, गटार काही ठिकाणी तुंबली आहे. या भागातील काही रहिवाशांनी वैयक्तिक नळ कनेक्शन घेतले आहे. जुनी-नवीन किंवा रहिवाशांच्या नळ कनेक्शनची पाइपलाइन जीर्ण अथवा गळकी झाल्यामुळे तेथून गटारीचे दूषित पाणी पिण्याच्या पाइपलाइनमध्ये मिसळत आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून या भागात दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. यामुळे रहिवासी प्रचंड त्रस्त झाले असून दूषित