अनंत कुबल एकांकिका स्पर्धेत ‘तो, ती आणि नाटक’ प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:44 AM2018-05-29T00:44:04+5:302018-05-29T00:44:04+5:30
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित स्व. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत नाट्यसेवा थिएटर्स नाशिकच्या ‘तो, ती आणि नाटक’ या एकांकिकेने प्रथम क्र मांक मिळवीत बाजी मारली.
नाशिक : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित स्व. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत नाट्यसेवा थिएटर्स नाशिकच्या ‘तो, ती आणि नाटक’ या एकांकिकेने प्रथम क्र मांक मिळवीत बाजी मारली. स्पर्धेत डोंबवलीच्या एका मिठीची गोष्टीने द्वितीय, तर ठाण्याच्या ‘रात्रीस खेळ चालेने’ तृतीय क्र मांक मिळवला. युरेका युरेका, ती सात वर्षे यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. दिग्दर्शनात प्रथम तो ती आणि नाटक यास, द्वितीय एका मिठीची गोष्टला मिळाले. सर्वोत्कृष्ट लेखनाचे पारितोषिक अन्वयला मिळाले. पार्श्वसंगीताचे प्रथम एका मिठीची गोष्टीला, द्वितीय तो ती आणि नाटकाला आणि तृतीय बक्षीस ती सात वर्ष या एकांकिकेस मिळाले. प. सा. नाट्यगृहात झालेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी सोमवारी (दि.२८) पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणो म्हणून अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, सतीश लोटले, निर्मला कुबल, श्रीकांत बेनी, सुनंदा रायते, प्रा. रवींद्र कदम, कार्यवाह सुनील ढगे, दत्त पाटील मान्यवर उपस्थित होते. नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने दरवर्षी स्व. अनंत कुबल यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत यंदा २८ एकांकिका सादर झाल्या आहेत. प्रथम तीन विजेत्या संघास पारितोषिक देण्यात आले. याशिवाय दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, अभिनय, पार्श्वसंगीत, लेखन आदी प्रकारातही बक्षिसे देण्यात आली.
पुणे, मुंबईचे स्पर्धक सहभागी
एकांकिका स्पर्धेत राज्यभरातून सहभागी झाल्या. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी ठाणे, कल्याण, पुणे, इचलकरंजी आदी ठिकाणच्या रात्रीस खेळ चाले, युरेका युरेका, न बाणाचा, एकूट समूह, फोबिया, म्याडम, मे वारी जावा आदी एकांकिका सादर झाल्या.