गुरुकुल, महालक्ष्मीनगर भागात निकृ ष्ट दर्जाचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 10:23 PM2020-08-11T22:23:30+5:302020-08-12T00:06:16+5:30
चांदवड : नगर परिषद अंतर्गत काही दिवसांपूर्वी गुरुकुल कॉलनीसह विविध नगरांत झालेली विकासकामे नियमाप्रमाणे झालेली नाही तसेच कामांचा दर्जाही निकृष्ट असल्याची तक्रार करत कामाची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शांताराम घुले यांनी मुख्य अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : नगर परिषद अंतर्गत काही दिवसांपूर्वी गुरुकुल कॉलनीसह विविध नगरांत झालेली विकासकामे नियमाप्रमाणे झालेली नाही तसेच कामांचा दर्जाही निकृष्ट असल्याची तक्रार करत कामाची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शांताराम घुले यांनी मुख्य अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राज्य व केंद्र शासन विविध विकासकामांना निधी पुरवत असते. परंतु शासन ज्या उद्देशाने लाखो रुपयांचा निधी देत असते तो निधी अधिकारी व ठेकेदार शहराऐवजी स्वत: विकास कसा होईल याकडे जास्त लक्ष देतात. यातूनच शासकीय नियम, मार्गदर्शक तत्त्वे न पाळता अतिशय निकृष्ट दर्जाची कामे केली जातात.
याबाबत घुले यांनी नगरविकास मंत्री, राज्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे निवेदन पाठवून न्याय मागितला आहे. जनतेच्या करातुन व शासनाच्या निधीतून अधिकारी व ठेकेदार जाणीवपूर्वक निकृष्ट दर्जाची कामे करत असल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. अन्यथा नगरवासीयांसोबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील कामे अत्यंत निकृष्ठ दर्जाची होत असून त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या कामाची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.नागरिकांत रोषशहरातील गुरुकुल कॉलनी, महालक्ष्मीनगर, गुजराथीनगर येथील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम नगर परिषदेने ऐन पावसाळ्यात सुरू केले. शिवाय झालेले कामही अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे गुणवत्ताहीन झालेले आहे. नगरवासीयांनी संबंधित सर्व विकासकामांची गुणवत्ता चाचणी शासनस्तरावर करण्याची मागणी केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करून संबंधितांनी कामे सुरूच ठेवल्याने कॉलनीवासीयांमध्ये रोष निर्माण झाला आहे.