मक्यावर अळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:17 AM2021-08-12T04:17:35+5:302021-08-12T04:17:35+5:30
ब्राम्हणगाव : येथे खरीप हंगामातील मका पिकावर अळीचे प्रमाण खूपच वाढल्याने उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून, जुलैसह ...
ब्राम्हणगाव : येथे खरीप हंगामातील मका पिकावर अळीचे प्रमाण खूपच वाढल्याने उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून, जुलैसह ऑगस्ट महिन्याचा आठवडा उलटूनही मोठा पाऊस न आल्याने पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. मोठा पाऊस नसल्यानेच पिकांवर त्याचा परिणाम होत असल्याने पिकांवर अळीचे प्रमाण वाढले आहे.
येथील रानमळा शिवारातील दीपक बाजीराव अहिरे यांच्या शेतात मका पिकाची लागवड केली असून त्यांच्या मका पिकावर तसेच परिसरातील शेतातील पिकांवर अळीचे प्रमाण वाढले आहे. अळी जाण्यासाठी शेतकऱ्यांनी कीटकनाशक औषधे मारली असली तरी, अळी जाण्यासाठी मोठा पाऊसच गरजेचा असल्याचे मका उत्पादक शेतकरी दीपक अहिरे यांनी सांगितले. मका पिकाबरोबरच सोयाबीन, ताग, कोबी, टोमॅटोसह अन्य भाजीपाला पिकांवर अळीने घात केला असून त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त बनला आहे.
-----------------------
वातावरणातील उष्म्यात वाढ
गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात उष्मा वाढला असून तापमानातही वाढ झाली आहे. पावसाळा संपून अडीच महिने झाले असून अद्याप मोठा पाऊस न पडल्याने काही शेतशिवारातील विहिरींची पाणीपातळीही घटू लागली असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे सावट पसरले आहे. श्रावण महिन्यात पुन्हा मोठ्या पावसाची शक्यता कमी असल्याने पुन्हा चिंतेत भर पडली आहे. शेतकऱ्यांनी शेतात महागडी बियाणे, खते, महागडी औषधे, मशागतीसाठी मोठा खर्च केला आहे. या अळीमुळे आर्थिक संकट उभे राहिल्याने शेतकरी विवंचनेत सापडला आहे.
-----------------------
शेतकऱ्यांनी मका पिकावरील अळीला घालवण्यासाठी महागडी औषधे फवारणी केली आहेत. मात्र अद्याप त्याचा परिणाम दिसून येत नाही. आता त्यासाठी मोठ्या पावसाची गरज असून मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.
- दीपक अहिरे, मका उत्पादक, ब्राम्हणगाव
---------------------------
(१० ब्राम्हणगाव)
100821\10nsk_6_10082021_13.jpg
१० ब्राह्णणगाव