मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 03:13 PM2020-06-27T15:13:43+5:302020-06-27T15:13:43+5:30
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा परिसरातील मका पिकावर लष्करी अळी रोगाच्या प्रदुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा परिसरातील मका पिकावर लष्करी अळी रोगाच्या प्रदुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
खामखेडा परिसरात दरवर्षी मका पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेलेले जाते. हजारो ऐक्टर क्षेत्र मका पिकाच्या लागवडी खाली असते. मका या पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहिले जाते. प्रत्येक शेतकरी हमखस मक्याची पेरणी करतो. कारण ऐण दिवाळी सणाच्या वेळेस हे पिक तयार होऊन शेतकऱ्यांच्या हाती हमखस दिवाळी सणासाठी व रब्बी हंगामासाठी पैसा उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील मकाचे पिक फार महत्वाचे असते.
गेल्या दोन-तीन वर्षापासून सतत कमी पडणारा पाऊस आणि मक्याचे पिक ऐन दाणे भरण्याच्या वेळस पाऊसाने दिलेली ओढ तसेच मका कापणीच्या बेमौसमी पाऊसाचा धुमाकूळ यामुळे हाती आलेल्या मकाचे कणसे या पावसाने भिजुन कणसातील मक्याचे दाणे खराब होऊन मक्याचे नुकसान होते.
या वर्षी चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा होती. मात्र पाहिजे त्याप्रमाणात पाऊस न झाल्याने शेतकºयाने मक्याची माहगडी बियाणे घेऊन अगदी अल्पशा पाऊसावर पेरणी केली. परंतु चालू वर्षी मक्याचे पीक उगवल्यानंतर त्याच्यावर लगेच लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. तेव्हा आतापासून मक्याचे पीक पिवळे पडून लागले आहे. लष्करी अळी रोगाचा प्रदुर्भाव दिसू लागल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
या रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी पिकावर रोगप्रतिबंधक विविध औषधे व पावडर यांची फवारणी व धुरळनी करतांना दिसून येत आहे. कडक ऊन पडल्याशिवाय पिकांवरील रोग निवळणार नाही असे जुन्या शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत