मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:17 AM2021-08-29T04:17:41+5:302021-08-29T04:17:41+5:30
उमराणे : मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही मका पिकावर लष्करी अळीनी थैमान घातले असून, उभ्या पिकाची नासाडी झाल्याने मका उत्पादनावर याचा ...
उमराणे : मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही मका पिकावर लष्करी अळीनी थैमान घातले असून, उभ्या पिकाची नासाडी झाल्याने मका उत्पादनावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
कांदापाठोपाठ नगदी पीक म्हणून मका पीक पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल असतो. मागील वर्षी जवळपास सर्वच जातींच्या मका पिकावर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीने थैमान घातल्याने मका उत्पादनावर याचा विपरीत परिणाम झाला होता.
परिणामी शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले होते. शिवाय अळीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी विविध कीटकनाशकांची फवारणी केल्याने गुरांसाठी लागणारा चाराही खराब झाल्याने दुहेरी संकट ओढावले होते. त्यामुळे यावर्षी ही हानी टाळण्यासाठी काही मका बियाणे कंपन्यांनी लष्करी अळीचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी सुधारणा केली. मात्र तरीही बहुतांशी ठिकाणी लष्करी अळीने थैमान घातल्याने मका पिकाची नासाडी झाली आहे.
दरम्यान मोठा पाऊस पडल्यास या लष्करी अळीचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे कृषी अभ्याकांचे मत आहे. मात्र अद्यापही उमराणेसह परिसरात जोरदार पाऊस नसल्याने लष्करी अळीचे संक्रमण वाढत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.