निºहाळे परिसरात विहीरींनी गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 05:39 PM2019-04-25T17:39:25+5:302019-04-25T17:39:38+5:30
निºहाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निºहाळे, फत्तेपूर, मºहळ, कणकोरी, मानोरी, सुरेगाव आदि परिसरात सध्या उन्हाचे चटके बसू लागले असून विहीरींनी तळ गाठल्याने शेतीची कामे थंडावली आहेत.
Next
निºहाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निºहाळे, फत्तेपूर, मºहळ, कणकोरी, मानोरी, सुरेगाव आदि परिसरात सध्या उन्हाचे चटके बसू लागले असून विहीरींनी तळ गाठल्याने शेतीची कामे थंडावली आहेत.
या पूर्वीचे दुष्काळ अन्नधान्य व चाऱ्याचा प्रश्न निर्माण करणारे होते, परंतु यंदाचा दुष्काळ पाण्याचा असल्याने जनतेला यासाठी मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. सिन्नरच्या पूर्व भागाच्या पाचवीला दुष्काळ पुजल्याचे बोलले जाते. पाणी नसल्याने परिसर ओसाड पडला आहे. गेल्या वर्षी अल्प पावसामुळे येथे नदी-नाल्यांना पूर आलेला नाही. त्यामुळे उन्हाळाच्या आधीच परिसरातील विहीरी कोरड्या पडल्या आहेत.