नेताजी बोस उद्यानात टवाळखाेरांचा उपद्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:15 AM2021-04-27T04:15:30+5:302021-04-27T04:15:30+5:30

यासंदर्भात रहिवाशांनी शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोनानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात उद्यान बंद ...

Infestation of Tawalkhears in Netaji Bose Park | नेताजी बोस उद्यानात टवाळखाेरांचा उपद्रव

नेताजी बोस उद्यानात टवाळखाेरांचा उपद्रव

Next

यासंदर्भात रहिवाशांनी शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोनानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात उद्यान बंद असल्यामुळे अनोळखी गुंड तसेच टवाळखोर व्यक्तींचा उद्यानात वावर वाढला आहे. मद्यसेवन करण्याबरोबर विविध बेकायदेशीर बाबींना त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळत असल्याने उद्यान परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. टवाळखोरांमध्ये काही किशोरवयीन मुलींचाही समावेश आहे. त्यांना हटकण्याचा आणि समज देण्याचा अनेकदा प्रयत्न केला. उलट त्यांच्याकडून धमकावले जाते. या साऱ्या गोष्टींमुळे या परिसरात राहणे मुश्कील झाले आहे. या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा त्वरित बंदोबस्त करावा, तसेच उद्यानाच्या संरक्षण भिंतीची उंची वाढवावी, या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा, उद्यानात पथदीपांची संख्या वाढवावी आदी मागण्यांचाही निवेदनात समावेश करण्यात आला आहे. निवेदनावर सुभाष पगार, माधव नवले, शिवाजी दौंड, के.आर. थोरकर भगतसिंग साळुंके, रमेश जाधव, कैलास पगार, हनुमान घोलप, चंद्रकांत पाटील, कैलास चिंचोरे, विशाल पगार, विलास सोनार, जयश्री दौंड, मंगल पगार, माधुरी राणे, वैशाली पाटील आदींच्या सह्या आहेत

(फोटो २६ नेताजी) नेताजी बोस उद्यानात वावरणाऱ्या गुंडांचा त्वरित बंदोबस्त करावा याबाबतचे निवेदन महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना देताना जयश्री दौंड, मंगल पगार, माधुरी राणे, वैशाली पाटील, चांगदेव पवार, सुभाष पगार, माधव नवले, शिवाजी दौंड आदी.

Web Title: Infestation of Tawalkhears in Netaji Bose Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.