खतवड परीसरात टमाट्यावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 06:33 PM2018-09-02T18:33:12+5:302018-09-02T18:34:01+5:30
तालुक्यातील खतवड परीसरातील टमाटा पीकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्यांने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
दिंझेरी : तालुक्यातील खतवड परीसरातील टमाटा पीकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्यांने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, दिंझेरी तालुका कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभाग यांच्या वतीने दखल घेत ,तालूका कृषी अधिकारी अभिजीत जमधडे, पंचायत समिती कृषी अधिकारी साबळे, कृषी सहाय्यक श्रीमती रूपाली लोखंडे ,आदींनी नुकसानग्रस्त पीकांची पहाणी करून, शेतकºयांशी संवाद साधून पीक व्यावस्थापन व उपाय योजनांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी तालूका कृषी अधिकारी अभिजीत जमधडे यांनी सांगितले, टोमॅटो पीकावर जमिनीतील हानिकारक मर रोगाचा (बँक्टेरीया )प्रादुर्भाव वाढला असल्याने, पीक कोमेजली आहेत. मर रोगाचा प्रसार अन्य पीकावर होवु नये, यासाठी, कोमजलेले टमाटे काढून पुर्णंपणे नष्ट करावीत. जेणे करून उर्वरीत अन्य पीकांवर प्रादुर्भाव होणार नाही. त्याच प्रमाणे, कारबेडझीम १ टक्का द्रावणाचे ड्रीचींग करण्याचा सल्ला दिला. यावेळी नुकसान ग्रस्त शेतकरी तुकाराम खुर्दळ, राजू कतोरे, भाऊसाहेब खुर्दळ, एकनाथ खुर्दळ, विलास खुर्दळ, गोपीनाथ खुर्दळ आदींसह शेतकरी उपस्थित होते.