बागलाण शहरासह तालुक्यातील २५ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 09:20 PM2020-07-24T21:20:24+5:302020-07-25T01:07:34+5:30
सटाणा : बागलाण तालुक्यात कोरोनाचा फैलाव वाढतच आहे .जायखेडा येथील सर्वाधित बाधित सापडल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत जाऊन सटाणा शहरासह तब्बल २५गावांमध्ये शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे .दरम्यान शुक्र वारी पुन्हा ताहाराबाद येथील एका वृद्धासह महिला बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असुन ३५ वर बाधितांची संख्या गेली आहे .तर कोरोनाने सात जणांचा बळी घेतला आहे .

बागलाण तालुक्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा शिरकाव झाला .नामपूर ग्रामीण रु ग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी सर्व प्रथम बाधित सापडला .त्या पाठोपाठ सटाणा शहरात त्याचा शिरकाव झाला .येथील पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकार्याला तसेच पोलीस उपनिरीक्षकाला कोरोनाची बाधा झाली .त्यानंतर एका प्रतिष्ठित व्यापार्याला बाधा झाल्याने त्याचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव होऊन सटाणा शहरात सर्वाधिक ३७ जणांना त्याची बाधा झाली तर एका मिहलेचा मृत्यू झाला .त्या पाठोपाठ ग्रामीण भागातील जायखेडा गावात सर्वाधिक बाधित आढळले .बाधित वाहन चालकाच्या अंत्यविधीला गेलेल्या तब्बल ५२ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वैद्यकीय अहवाला वरून आढळून आले .जायखेडा येथील वाहन चालकासह बाधित डॉक्टर पित्याचा कोरोनाने बळी घेतला .त्याच्या नंतर सोमपूर येथीलडॉक्टर व ठेंगोडा येथील डॉक्टर दाम्पत्याला देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ताहाराबाद येथे १९ जणांना त्याची लागण झाली .त्यामध्ये ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकारी कोरोनाने बाधित सापडल्या .तर एक तरु ण कोरोनाचा बळी ठरला .बागलाण मध्ये सटाणा ,ताहाराबाद ,नामपूर ,मुल्हेर ,मुंजवाड ,डांगसौंदाणे ,ब्राम्हणगाव ,लखमापूर ही गावे हॉटस्पॉट ठरले आहेत .
बागलाणमध्ये गेल्या साडे तीन महिन्यात सात डॉक्टर आणि एक पोलीस अधिकारी यांना कोरोनाची लागण झाली होती . त्यामध्ये चार खासगी डॉक्टरांचा समावेश आहे .तालुक्यात अखेर पर्यंत १४४ जणांना लागण झाली तर सटाणा ,मुल्हेर ,ताहाराबाद ,तांदुळवाडी ,मळगाव येथील प्रत्येकी एक तर जायखेडा येथील दोन अशा सात जणांचा कोरोनाने बळी घेतला . बाधितांमध्ये सर्वाधित ७५ पुरु षांचा, ५६ महिला ,७ बालके ६ बालिकांचा समावेश आहे .