दिंडोरीत कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:19 PM2020-05-08T22:19:17+5:302020-05-09T00:03:42+5:30

दिंडोरी : तालुक्यातील इंदोरे गावातील एका ४६ वर्षीय पुरु षाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह  आल्याने तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

 Infiltration of corona in Dindori | दिंडोरीत कोरोनाचा शिरकाव

दिंडोरीत कोरोनाचा शिरकाव

googlenewsNext

दिंडोरी : तालुक्यातील इंदोरे गावातील एका ४६ वर्षीय पुरु षाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह  आल्याने तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. तसेच तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असलेले झारली पाडा येथील सहा पैकी पाच रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, एक रिपोर्ट येणे बाकी असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील गावापासून दूर असलेल्या वस्तीवरील ४६ वर्षीय पुरु ष जो मुंबई येथे नोकरीस असून, तो २६ एप्रिल रोजी मुंबई येथून एका भाजीपाला वाहतूक करणाऱ्या गाडीमधून गावांकडे पोहोचलेला होता. गावापासून वस्ती दूरवर असल्याने संबंधित व्यक्ती मुंबईवरून आल्याची कुणकुण चार दिवसानंतर लागली. त्यानंतर प्रशासनाने माहिती मिळाल्यावर त्याची आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी करून त्यास नाशिकच्या रु ग्णालयात २ मे रोजी दाखल केले होते.
संबंधित रुग्णाचे रिपोर्ट शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील यंत्रणा पुन्हा कामाला लागली असून, आज प्रशासनाच्या वतीने इंदोरे व तळेगाव दिंडोरी शिवारातील त्या रुग्णांच्या वस्तीपासूनचा दोन किलोमीटरचा भाग प्रतिबंधित केला असून, परिसरात आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी केली जात आहे.
त्या व्यक्तीच्या कुटुंबातील लहान मोठे असे एकूण १२ व शेजारचे २, व ज्या गाडीत तो आला होता त्या गाडीचा चालक असे एकूण १५ जणांना कोविड विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांची तपासणी करून स्वॅब परीक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. तसेच चार दिवसात ती व्यक्ती अजून परिसरातील कोणत्या गावात, कोणाकडे गेली होती याचाही शोध सुरू आहे.
-----
प्रशासन सतर्क
संबंधित रु ग्ण व त्याचे कुटुंब व परिसरातील नागरिकांना उपाययोजना करण्यासाठी प्रांत अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद कोशिरे, पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे, तळेगाव आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण, त्यांची सर्व टीम, प्रशासनाची सर्व टीम विशेष परिश्रम घेत आहे. याबाबत तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहत आपली काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांत अधिकारी डॉ. संदीप आहेर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद कोशिरे यांनी केले आहे.

Web Title:  Infiltration of corona in Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक