लॉकडाउनच्या काळात घुसखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 09:58 PM2020-04-17T21:58:38+5:302020-04-18T00:26:23+5:30

नाशिक : लॉकडाउन काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जंगलांमध्ये गुन्हेगारी कारवाया वाढल्याने वनविभागाच्या नाकीनव आले आहे. वनविभागाकडून दक्षता पथकासह सर्वच गस्ती पथकांना ‘अलर्ट’ दिला गेला आहे.

 Infiltration during lockdown | लॉकडाउनच्या काळात घुसखोरी

लॉकडाउनच्या काळात घुसखोरी

Next

नाशिक : लॉकडाउन काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जंगलांमध्ये गुन्हेगारी कारवाया वाढल्याने वनविभागाच्या नाकीनव आले आहे. वनविभागाकडून दक्षता पथकासह सर्वच गस्ती पथकांना ‘अलर्ट’ दिला गेला आहे. सातत्याने त्र्यंबकेश्वर, पेठ, हरसूल या संवेदनशील वनपरिक्षेत्र अंतर्गत दिवस-रात्र गस्तीवर आणि जंगलांच्या फिरस्तीवर भर दिला जात आहे. पेठ वनपरिक्षेत्रातील काही गावांमध्ये रात्रीच्या सुमारास वनक्षेत्रपालांच्या पथकाने एक नाल्यामध्ये दडवून ठेवलेली सागाची काही लाकडे जप्त केली. सकाळी आजूबाजूचा सगळा परिसर पिंजून काढला असता सागाची एकूण ४० नग वनक्षेत्रपाल सीमा मुसळे यांनी जप्त केले.
पेठ-नाशिक-त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सीमेवर पेठ वनपरिक्षेत्रच्या हद्दीत नियमितपणे जंगलांच्या भागात गस्त का ती जात होती वनक्षेत्रपाल सीमा मुसळे यांचे पथक गस्तीवर होते. दरम्यान, उंबरदहाड, रुईपेठा, कोहूर या तीन गावांत नाल्यामध्ये टप्याटप्याने सागाची लाकडे लपवून ठेवण्यात आली होती. वनविभागाच्या गस्तीपथकाने मात्र लाकूडतोड्यांचा हा डाव उधळून लावला. या तिन्ही गावांच्या हद्दीतून सागाची सुमारे ४० नग (०.२६० घनमीटर) इतके लाकूड जप्त करण्यास वनविभागाला यश आले आहे.
लॉकडॉउन काळात हाताला रोजगार न राहिल्यामुळे शहरी भागात स्थलांतरित झालेले लोक पुन्हा ग्रामीण भागात परतले आहे. पेठ हा अत्यंत दुर्गम आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. या भागात पावसाळ्यात सहजरीत्या रोजगार उपलब्ध होतो कारण शेतीच्या कामांना तेव्हा वेग आलेला असतो, मात्र अन्य दिवसांमध्ये रोजगारासाठी येथील आदिवासी नागरिकांना भटकंती करावी लागते काही नागरिक नाशिक शहरात तर काही गुजरात राज्यातदेखील रोजगारासाठी स्थलांतरित होतात. कोरोना आजाराचा फैलाव राज्यात वेगाने होऊ लागल्याने महिनाभरापूर्वीच लॉकडाउन घोषित केले गेले. त्यामुळे सगळे लोक आपापल्या घरी परतले आहे. घरात रिकामे बसून राहावे लागत असल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचाच फायदा काही गुन्हेगार घेत असून, गोरगरीब भोळ्याभाबड्या स्थानिकांना पैशांचे आमिष दाखवून जंगलात घूसखोरी करण्यास भाग पाडले जात आहे. साग, खैर, चंदन यासारखी मौल्यवान वृक्ष प्रजातीवर कुºहाड चालविण्यासाठी स्थानिक लोकांना भाग पाडले जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वनविभागाची जंगलाच्या रूपाने असलेली ह्यखुली तिजोरीह्ण धोक्यात येऊ लागली आहे.
पेठ भागात करण्यात आलेल्या कारवाईत सागाची ४० नग जप्त केले गेले. या लाकूडतोडीत स्थानिकांचा सहभाग असून, घरगुती कारणासाठी स्थानिक स्तरावरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून हा गुन्हा घडविला गेला असल्याचा प्राथमिक अंदाज मुसळे यांनी वर्तविला आहे. शेजारील राज्यातील तस्करटोळ्यांचा यामागे काही हात आहे का, याचीही चाचपनी केली जात असून, धागेदोरे शोधले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, हरसूल, पेठ या दोन्ही संवेदनशील वनपरिक्षेत्रांमध्ये सर्व वनरक्षकांना आपापल्या बीटमधील जंगल भागात अधिक गस्त घालावी, त्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची मदत घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

Web Title:  Infiltration during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक