अनंत कुबल एकांकिका स्पर्धेस प्रारंभ नाट्य परिषद : दोन दिवसात चौदा एकांकिका सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:24 AM2018-05-27T01:24:32+5:302018-05-27T01:24:32+5:30
नाशिक : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित स्व. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी आणि निर्मलाताई कुबल यांच्या हस्ते करण्यात आले.
नाशिक : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित स्व. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी आणि निर्मलाताई कुबल यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्या दिवशी आठ एकांकिकांचे सादरीकरण झाले. दि. २८ मेपर्यंत प.सा. नाट्यगृहात सदर स्पर्धा सुरू राहणार आहे.
नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने दरवर्षी स्व. अनंत कुबल यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. दि. २८ मेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत यंदा २८ एकांकिका सादर होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, निर्मलाताई कुबल, सावानाचे कार्याध्यक्ष धर्माजी बोडके, नाटयगृह सचिव अॅड. अभिजित बगदे यांच्यासह नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे उपस्थित होते. यावेळी, ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भोईर कुटुंबीयातील सुरेश भोईर, नंदा रायते उपस्थित होते. सुनील ढगे यांनी प्रास्ताविकात नेताजी भोईर यांच्या नाटकांच्या संहिता परिषदेच्या वतीने जतन केले जाणार असल्याचे सांगत दरवर्षी त्यांच्या नावाने लेखनाचा पुरस्कार दिला जाणार असल्याचे सांगितले. दरम्यान, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, धर्माजी बोडके, अभिजित बगदे यांनीही मनोगत व्यक्त केले व रंगकर्मींना शुभेच्छा दिल्या.