कैरीच्या लोणच्याला महागाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 09:49 PM2020-06-21T21:49:07+5:302020-06-22T00:01:46+5:30

जळगाव निंबायती : यंदाच्या वर्षी मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसाच्या सरी वेळेत कोसळल्याने ग्रामीण भागातील गृहिणींची लोणचे बनविण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे घरोघरी चटकदार कैरीच्या लोणच्याचा सुवास दरवळत आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत कैरीचे व त्यासाठी लागणाऱ्या मसाल्याचे भाव वाढल्याने चटकदार लोणच्याला महागाईची झळ बसली आहे.

Inflation hits Carrie's pickle | कैरीच्या लोणच्याला महागाईची झळ

कैरीच्या लोणच्याला महागाईची झळ

Next
ठळक मुद्देजळगाव निंंबायती : लॉकडाऊनमुळे गतवर्षीच्या तुलनेत कैरी, मसाल्याचे भाव वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव निंबायती : यंदाच्या वर्षी मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसाच्या सरी वेळेत कोसळल्याने ग्रामीण भागातील गृहिणींची लोणचे बनविण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे घरोघरी चटकदार कैरीच्या लोणच्याचा सुवास दरवळत आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत कैरीचे व त्यासाठी लागणाऱ्या मसाल्याचे भाव वाढल्याने चटकदार लोणच्याला महागाईची झळ बसली आहे.
महाराष्टÑीयन पद्धीच्या मराठमोळ्या जेवणाच्या ताटात आंबट, गोड, तिखट व काहीसे खारट असे चटकदार कैरीचे लोणचे असल्याशिवाय जेवणाला पूर्णत्व प्राप्त होत नाही. जेवणाच्या ताटात कितीही व्यंजन असले तरी तोंडी लावायला कैरीच्या लोणच्या शिवाय जेवणाला रंगत येत नाही. लहानग्यापासून ते वयोवृध्दापर्यंत सर्वांच्याच पसंतीस पडणारे कैरीचं लोणचं हा बहुधा एकमेव खाद्यपदार्थ असावा. भाजी आवडली नाही तर, चटकदार लोणचे हा हुकुमी पर्याय मानला जातो.
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व तदनंतर ढगाळ हवामानामुळे आंब्याचा मोहोर उशिरा व कमी लागला होता. त्यातच चक्र ीवादळामुळे व मान्सून पूर्व पावसाच्या वादळी वार्यामुळे आंब्याचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्या कोकणासह राज्याच्या अनेक भागात आंब्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यातच कोरोनाच्या पाशर््वभूमीवर देशभरात झालेल्या लॉकडाऊनमुळे कैरी व पिकलेला आंबा ग्राहकांपर्यंत पोहचू शकला नाही. आपआपल्या कुटुंबाच्या गरजेनुसार कैरी खरेदी केली जाते. काळपट हिरवी, आतून पांढरी शुभ्र, दळदार, छोटी व केसाळ कोय असलेली कैरी लोणच्यासाठी उत्तम समजली जाते.
पूर्वी ग्रामीण भागात एका कैरीचे केवळ दोनच फोडी करु न डवरे भरण्याची पध्दत होती. आता मात्र वाढत्या महागाईमुळे डवरे भरणे परवडत नाही म्हणून कैरीच्या बारीक फोडी करु न लोणचे भरले जाते. फोडींना हळद व मीठ लावून काही काळ ठेवल्यास व तद्नंतर लोणचे भरले असता ते दिर्घकाळ टिकते. लोणच्याचा चमचमीत मसाला (खार) बनवण्यासाठी शुध्द शेंगदाणा तेल, लाल मिरची, हळद, हिंग, मेथीचे दाणे, दालचिनी, कपुरचीनी, लवंग, मिरी, वेलदोडा, बडीशेप, मोहरीची डाळ व मीठ आदी पदार्थाची आवश्यकता असते. वर्षभर लोणचं साठवून ठेवण्यासाठी लागणाºया या चिनी मातीच्या बरणीच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महागाईमुळे लोणच्याची गोडी काहीशी कमी होतांना दिसत आहे.बाजारभाव ४० ते ८० रु पये प्रति किलोया सर्वांची परिणीती म्हणून यंदाच्या वर्षी लोणच्यासाठीच्या कैरीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. कैरीची आवक कमी झाल्याने व मागणी वाढल्याने लोणच्यासाठीच्या कैरीचा बाजारभाव ४० ते ८० रु पये प्रति किलो तर बाराशे ते सोळाशे रुपये प्रति शेकडा आहे. जसा माल तसा भाव या गणतिावर कैरीचे दर ठरत असतात. कैरी विकत घेतांनाची पध्दत ही शेकडा असली तरी सहा कैऱ्यांचा एक फड म्हणजे शेकड्यात १२० कैरी येते. पूर्वापार चालत आलेली ग्रामीण भागातील ही पध्दत आजही कायम आहे. वर्षभरासाठी उन्हाळ्यात करण्यात येणाºया या वाळवन पदार्थांना जेवढे महत्व असते तेवढेच, रोजच्या जेवणात आवश्यक असलेल्या कैरीच्या चटकदार लोणच्याला असते. यंदा मात्र कोरोनाच्या पाशर््वभूमीवर सावधानता बाळगत, वाढत्या महागाईचा विचार करता मनाप्रमाणे भरपूर लोणचे भरता आले नाही. यामुळे घरोघरी लोणच्याचा वानोळा देता येणार नाही.
- अमृता अहिरे,
गृहिणी, जळगाव निंबायती

Web Title: Inflation hits Carrie's pickle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.