मसाल्याला महागाईचा तडका! २५ टक्क्यांनी वाढले दर; स्वयंपाक करावा की नाही, गृहिणींना पडला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 10:28 AM2022-02-09T10:28:18+5:302022-02-09T10:41:16+5:30

मसाल्याच्या विविध पदार्थांचे उत्पादन घटल्यामुळे काही पदार्थांमध्ये दरवाढ झाली आहे. भविष्यात यात खूप काही फरक पडेल असे नाही. पुढील ...

Inflation in spices; 25 per cent increase in rates | मसाल्याला महागाईचा तडका! २५ टक्क्यांनी वाढले दर; स्वयंपाक करावा की नाही, गृहिणींना पडला प्रश्न

मसाल्याला महागाईचा तडका! २५ टक्क्यांनी वाढले दर; स्वयंपाक करावा की नाही, गृहिणींना पडला प्रश्न

googlenewsNext

मसाल्याच्या विविध पदार्थांचे उत्पादन घटल्यामुळे काही पदार्थांमध्ये दरवाढ झाली आहे. भविष्यात यात खूप काही फरक पडेल असे नाही. पुढील काही दिवस तरी दर कायम राहातील, असा विक्रेत्यांचा अंदाज आहे.

मसाल्याचे भाव

प्रकार    सध्याचे भाव   गेल्यावर्षीचे भाव

हळद         १६०                 १२०

जिरं           २२५                 १८०

धने            १४०                  १२०

गृहिणी काय म्हणतात?

स्वयंपाक घरात लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तूंचे दर वाढले असल्याने घरात स्वयंपाक करावा की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणतीही भाजी घ्यायची तर पावशेरासाठी किमान २० ते २५ रुपये मोजावे लागतात. त्यात आता मसाल्यांचीही भर पडली आहे.

- रोहिणी जाधव, गृहिणी

आम्ही वर्षाचा मसाला तयार करून ठेवत असतो. तरीही हळद, जिरे वैगेरे पदार्थ गरजेपुरते घ्यावे लागतातच. दर वाढल्याने यावर्षी मसाला तयार करण्याचा खर्च वाढेल. यामुळे दरवेळेपेक्षा प्रमाण थोडेफार कमी करावे लागेल. काही वेळा तयार मसालाही वापरावा लागेल.

- प्रमिला जाधव, गृहिणी

Web Title: Inflation in spices; 25 per cent increase in rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.