अमेरिका, चीनच्या तुलनेत भारतात महागाई कमी; केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांचे मत

By संजय पाठक | Published: August 31, 2022 01:40 PM2022-08-31T13:40:23+5:302022-08-31T13:41:23+5:30

महागाई आहे हे मी देखील मान्य करतो. मात्र अमेरिका-चीनच्या तुलनेत आपल्याकडे कमी महागाई आहे, असे मत केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी आज नाशिक येथे व्यक्त केले.

Inflation is lower in India compared to US and China says Union Minister of State for Finance Bhagwat Karad | अमेरिका, चीनच्या तुलनेत भारतात महागाई कमी; केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांचे मत

अमेरिका, चीनच्या तुलनेत भारतात महागाई कमी; केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांचे मत

googlenewsNext

नाशिक - 

महागाई आहे हे मी देखील मान्य करतो. मात्र अमेरिका-चीनच्या तुलनेत आपल्याकडे कमी महागाई आहे, असे मत केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी आज नाशिक येथे व्यक्त केले. नाशिक मध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय महानुभाव पंथाच्या संमेलनाच्या समारोपासाठी ते नाशिक मध्ये आले असून शासकीय विश्रामगृहावर माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते.

केंद्र शासनाने दोन वेळ डिझेल पेट्रोल दर कमी केले आहे याचे स्मरण त्यांनी करून दिले तसेच महागाईवर आंदोलने करणाऱ्या विरोधकांना त्यांनी उत्तर दिलं. महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांत काय केलं? फक्त केंद्राकडे बोट दाखवलं असे सांगून त्यांनी राज्यातील मंत्री माझं कुटुंब, माझी जबाबदारी सांभाळत राहिले अशी टीकाही केली.
भाजप नेते राज ठाकरे यांना भेटले यात काय समीकरण येईल माहीत नाही मात्र आता जनतेच्या मनातील सरकार आहे हे विकास करणार सरकार आहे, असे तर म्हणाले. आता निवडणुका झाल्या तरी आम्हाला खात्री आहे भाजप शिवसेना ( शिंदे गट ) 200 पेक्षा जास्त जागा जिंकतील असेही कराड म्हणाले.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे नाराज नाही त्यांच्याकडे पक्षातील केंद्रीय सचिव पद त्या नुकत्याच दिल्लीत येऊन गेल्या माझी भेट झाली त्या नाराज नाही, असेही कराड म्हणाले.

Web Title: Inflation is lower in India compared to US and China says Union Minister of State for Finance Bhagwat Karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.