महागाईने तेल ओतले; घरातले बजेट बिघडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:19 AM2021-09-08T04:19:23+5:302021-09-08T04:19:23+5:30
चौकट- तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला महिन्याचा खर्च वस्तू ...
चौकट-
तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला महिन्याचा खर्च
वस्तू वाढलेला खर्च (रुपयांमध्ये)
खाद्यतेल - ५०
धान्य - १००
शेंगदाणे - २०
साखर - २०
साबूदाणा - १५
चहापूड - ४०
डाळ - ९०
गॅस सिलिंडर - २५०
पेट्रोल-डिझेल - ३००
एकूण -८८५
चौकट-
डाळीशिवाय वरण
कितीही महागाई वाढली तर काही गोष्टी कमी करता येत नाहीत. जेवणात वरण-भात आवश्यक आहे. यामुळे तुरीची, मुगाची डाळ ही घ्यावीच लागते. महिन्याकाठी किमान तीन ते चार किलो डाळ लागत असते. गेल्या काही दिवसांत डाळीच्या दरात किलोमागे किमान ७ ते ८ रुपये वाढ झाली आहे. डाळीशिवाय वरण होऊ शकत नसल्याने त्याची खरेदी करावीच लागते. फक्त त्याचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते.
चौकट-
अशी वाढली महागाई
गेल्या वर्षभरात महागाई एकदम वाढली नसली तरी टप्प्याटप्प्याने प्रत्येक वस्तूच्या दरात वाढ होत गेली आहे. सुरुवातील खाद्यतेल महागले. त्यानंतर डाळींच्या दरात वाढ झाली. त्याची सवय होते ना होते तोच साखर दोन-तीन रुपयांनी महागली. पेट्रोल आणि डिझेल तर काय रोजच महाग होत आहे. त्यात आता शासनाने गॅस सिलिंडर दरवाढीचा फटका दिला आहे. किरकोळ बाजारांमध्ये भाजीपाल्याचे दर काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत.
जानेवारीतील दर सध्याचा दर (प्रती किलो रुपयांत)
शेंगदाणा तेल -
सोयाबीन तेल
शेंगदाणे
साखर
साबूदाणा
मसाले
चहापूड
तूरडाळ
मूगडाळ
उडीद डाळ
हरभरा डाळ
चौकट-
सिलिंडर हजाराच्या घरात
गॅस सिलिंडरवर देण्यात येणारी सबसीडी केंद्र शासनाने आता पूणपणे बंद केली आहे. महिना - दोन महिन्यांच्या फरकाने गॅस सिलिंडरच्या दरात २५-३० रुपयांनी वाढत वाढत आज सिलिंडरची किंमत ९०० रुपयांपर्यंत गेली आहे. यामुळे आता नेमके करायचे काय, असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला आहे.
कोट-
कोराेनाची पहिली लाट ओसरली आणि महागाईने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. आज गॅससह स्वयंपाकघरातील सर्वच वस्तू महागल्याने खर्चाचा ताळमेळ बसविणे मुश्कील झाले आहे. खाण्याच्या वस्तू हव्या तेवढ्या घ्याव्याच लागतात. - रोहिणी पगारे, गृहिणी
कोट-
शासनाने सुरुवातील सबसिडी बॅंकेत जमा करण्याच्या नावाखाली गॅस सिलिंडर रोखीने घेण्याची सवय लावली आणि हळूहळू सबसिडी बंदच करून टाकली. मागील पाच-सहा महिन्यांपासून भाजीपाला, डाळी महागल्या आहेत. खाद्यतेलाने तर केव्हाच शंभरी पार केली असल्याने खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. - मनीषा बागुल, गृहिणी