तीळ, गुळावर महागाईची संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:12 AM2020-12-26T04:12:31+5:302020-12-26T04:12:31+5:30
ऊसतोडणी कामगारांना वाढवून दिलेले मानधन, वाहतूक खर्चात झालेली वाढ याचा साखरेच्या उत्पादन खर्चावर थेट परिमाण झाला असून, यावर्षी ...
ऊसतोडणी कामगारांना वाढवून दिलेले मानधन, वाहतूक खर्चात झालेली वाढ याचा साखरेच्या उत्पादन खर्चावर थेट परिमाण झाला असून, यावर्षी गुळाच्या व साखरेच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्याशिवाय पेट्रोल व डिझेलने शंभरीच्या जवळ मजल मारल्याने या सर्वांचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे.
मकरसंक्रांत हा भारतातील एक महत्त्वाच्या सणांपैकी एक मानला जातो. संक्रांतीच्या दिवशी आप्तस्वकीयांना तिळगूळ वाटून बंधुभाव वृद्धिंगत केला जातो. कोरोना व त्यानंतर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे यंदा बाजारात तीळ आणि गुळाची आवकही कमी झाली. यामुळे ऐन संक्रांतीच्या तोंडावर तीळ, गूळ आणि साखरेचे दर पाच ते दहा टक्क्यांनी वाढले आहेत.
तीळ
मकरसंक्रांतीमध्ये बनवण्यात येणाऱ्या गोड पदार्थांमध्ये तीळ आवर्जून वापरली जातो. लॉकडाऊनच्या आधी १८० रुपये किलो असणारी तीळ मकरसंक्रांतीच्या तोंडावर २०० रुपये किलो झाली आहे.
गूळ
लॉकडाऊन व त्यानंतर पडलेला अवकाळी पाऊस यामुळे उसाच्या शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. किरकोळ बाजारात गुळाचा दर काही प्रमाणात वाढला. लॉकडाऊनआधी ६० रुपये किलो असणारा गूळ लॉकडाऊननंतर ७० रुपये प्रतिकिलो मिळाला आहेे.
साखर
लॉकडाऊनच्या काळात वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला. त्यानंतर डिझेलचे दर वाढल्यामुळे नाशिकमध्ये येणारी साखर काही प्रमाणात महागली. लॉकडाऊनआधी ३४ रुपये किलो असणारी साखर लॉकडाऊननंतर ३८ रुपये किलो झाली आहे.
कोट-
मकरसंक्रांतीवर यंदा कोरोनाचे सावट असले तरीदेखील गोड पदार्थ बनवण्यासाठी साखर, गूळ यांची मागणी वाढली आहे. सर्व वस्तूंचे दर पाच ते दहा टक्क्यांनी वाढले आहेत. असे असूनही ग्राहक खरेदी करत आहेत.
Translation
☰
पुढील आठवड्यात या सर्व पदार्थाचे दर स्थिर राहतात की घसरतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
शेखर दशपुते, माजी अध्यक्ष, नाशिक धान्य किराना किरकोळ व्यापारी संघटना
कोट-
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व दिवाळी या सणांमध्ये मिठाई अथवा गोड पदार्थ बाहेरून खरेदी न करता ते घरातच बनविण्यात आले. मकरसंक्रांतीलाही दरवर्षी घरात गोड बनते. गुळाचे दर वाढले असले तरीही सण तर साजरा करावा लागणारच, त्यामुळे त्याच उत्साहात यंदाही गोड पदार्थ बनवायचे आहेत.
शीतल महाले, गृहिणी