उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 06:28 PM2019-12-12T18:28:08+5:302019-12-12T18:29:34+5:30
गोदाकाठी प्रारंभी पाणीटंचाईने, त्यानंतर गोदावरी, दारणा व ओहळांना आलेल्या महापुराने आणि शेवटी अतिवृष्टीने शेतपिकांचे नुकसान झाले. अशाही परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी ऊस वाचविले त्याची आता पाने पिवळे पडून त्यावर लाल ठिबके पडत असून, त्यावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
चांदोरी : गोदाकाठी प्रारंभी पाणीटंचाईने, त्यानंतर गोदावरी, दारणा व ओहळांना आलेल्या महापुराने आणि शेवटी अतिवृष्टीने शेतपिकांचे नुकसान झाले. अशाही परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी ऊस वाचविले त्याची आता पाने पिवळे पडून त्यावर लाल ठिबके पडत असून, त्यावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यात ढगाळ वातावरण आणि वाढती थंडी यामुळे पिकांची वाढ थांबली आहे. यामुळे उत्पन्नाची सरासरी घटण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
नगदी पीक आणि कमी खर्च, कमी मेहनत म्हणून गोदाकाठचा शेतकरी उसाला नेहमीच पसंती देत आला आहे. साधारणत: जुलै ते आॅगस्टदरम्यान उसाची लागवड केली जाते. एकरी सहा ते सात हजार रुपयांप्रमाणे बेणे घ्यावे लागते. शेतीची नांगरणी, सरी पडणे, वाफे बांधणे व त्यानंतर ऊस लागवड व लागवडीबरोबरच प्रारंभी खताचा पहिला डोस द्यावा लागतो. साहजिक प्रारंभी एकेरी २० ते २५ हजार रु पये खर्च करून हे पीक उभे करावे लागते. निफाडसह गोदाकाठ भागात खोडवा, आडसाली सुरू उसाचे उत्पादन घेतले वर्षी. मात्र यावर्षी उन्हाळ्यातील पाणीटंचाई हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी बोअरवेल, नदी विहीर शर्तीचे प्रयत्न करून उसाचे पीक वाचविले. त्यानंतर गोदावरी आलेल्या महापुराने झाला. अतिपाण्यामुळे पिके सडली तर आता अतिवृष्टीमुळे व ढगाळ वातावरण तसेच वाढती थंडी यामुळे उसाच्या पिकाला धोका निर्माण झाला आहे. या रोगापासून जे वाचले ते आता साखर कारखान्यांना तोडून देण्याची वेळ आली असताना काही दिवसांची पाने पिवळी पडून लालसर ठिपके पडू लागले आहेत. साहजिक उसाच्या वाढीवर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे सरासरी उसाच्या वजनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नैसर्गिक आपत्ती व पिकांवर येणाºया विविध रोगांबाबत कृषी विभागाकडून शेतकºयांना वेळोवेळी मार्गदर्शन होणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहे.