गव्हावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 06:52 PM2020-02-15T18:52:31+5:302020-02-15T18:53:24+5:30
निफाड तालुक्यातील खेरवाडी, चांदोरी तसेच गोदाकाठच्या गावांत मागील काही दिवसांपासून कमी जास्त होणारी थंडी व तसेच ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामातील गव्हाच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव पडत आहे. खरिपापाठोपाठ रब्बीचा हंगाम निसर्गाच्या लहरीपणामुळे धोक्यात आल्याने शेतकरी पुन्हा चिंतित सापडले आहेत.
चांदोरी : निफाड तालुक्यातील खेरवाडी, चांदोरी तसेच गोदाकाठच्या गावांत मागील काही दिवसांपासून कमी जास्त होणारी थंडी व तसेच ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामातील गव्हाच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव पडत आहे. खरिपापाठोपाठ रब्बीचा हंगाम निसर्गाच्या लहरीपणामुळे धोक्यात आल्याने शेतकरी पुन्हा चिंतित सापडले आहेत.
मागील काही दिवसांपासून कमी जास्त होणारी थंडी व ढगाळ वातावरण यामुळे गव्हावर तांबेरा (बुरशी)रोग दिसून येत आहे. काही ठिकाणी गव्हाची पाने पिवळी पडत आहेत. त्यामुळे गव्हाची वाढ खुंटली आहे. पोषक वातावरण नसल्याने गव्हाच्या पिकावर तांबेरा रोग पडला आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने आता सगळी आशा रब्बी हंगामातील पिकांवर आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे रब्बी हंगामात पिकाचं उत्पादन कमी होण्याच्या चिंतेने शेतकरी ग्रासले आहेत. मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे तसेच गोदाकाठ पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे; परंतु निसर्गचक्र ामुळे शेतकरी हतबल झाला आहे. खरिपाची कसर रबीत भरून काढण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. परंतु बदलत्या वातावरणामुळे शेतकरी चिंता व्यक्त करत आहे.
वातावरण बदलामुळे गव्हासह हरभरा, ज्वारी पिकांवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे उत्पादनात प्रचंड घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पिकांवर महागडी औषध फवारली केली जात आहे; पण त्याचा फारसा परिणाम दिसून येत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहे.