थंडीचा कडाक्याने द्राक्ष कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 12:46 AM2020-01-08T00:46:36+5:302020-01-08T00:48:33+5:30
खेडलेझुंगे : जिल्ह्यात गेल्या पंधारावाड्यापासुन थंडीचा कडाका कायम असुन नागरीकांना हुडहुडी भरली आहे. द्राक्ष वकांदा उत्पादकांच्या चेर्यावर बारा वाडलेले आहे. मागील चार-पाच दिवसांपासुन परिसरात मोठ्या प्रमाणावर गार वारे वाहत आहे. त्यामुळे शेतकरी धास्ताला आहे. परिसरामध्ये वारंवार वातावरणातील होणार्या बदलामुळे पिक वाचिवणे अत्यंत जिकरीचे झालेले आहे.
खेडलेझुंगे : जिल्ह्यात गेल्या पंधारावाड्यापासुन थंडीचा कडाका कायम असुन नागरीकांना हुडहुडी भरली आहे. द्राक्ष वकांदा उत्पादकांच्या चेर्यावर बारा वाडलेले आहे. मागील चार-पाच दिवसांपासुन परिसरात मोठ्या प्रमाणावर गार वारे वाहत आहे. त्यामुळे शेतकरी धास्ताला आहे. परिसरामध्ये वारंवार वातावरणातील होणार्या बदलामुळे पिक वाचिवणे अत्यंत जिकरीचे झालेले आहे.
थंडी, धुके, दैवर आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांसह कांदा पिकांवर रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याने महागडी औषधांची फवारणी दिवस-रात्र करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट गडद होण्याची चिन्ह निर्माण झालेली आहे.
उपलब्ध शेती मालाला भावनाही, शेतातील पिके औषध फवारणी करु नही येतील की नाही याबाबत शाशंका निर्माण झालेली आहे. वारंवार वातावरणातील बदल आण िवळव्याचा पाऊस यांमुळे पिकांचे होणारे नुकसान आणि रोगांचा मोठ्या प्रमाणावरील प्रादुर्भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. मागील वर्षापासुन किटकनाशकांचा अधिक प्रमाणावर वापरांमुळे उत्पादनात मोठी घट झालेली आहे.
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर साचणाºया दविबंदुमुळे तसेच बदलत्या वातावरणामुळे फवारणीसाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत असल्याने शेतकºयांपुढे चिंतेचे ढग दाटलेले आहेत.
शेतकºयांच्या संकटात सतत वाढ
सद्या दिवस उगविल्यासोबत नवनवीन रोगराई आणि निसर्गाचे बदललेले रु प बघावयास मिळत आहे. कधी हवामानात बदल, कधी धुक, कधी दैवर, कधी पावसाची रिमझिम त्यातच गगनाला भिडलेले खते-औषधांच्या किमती, कोलमडलेले शेती मालाचे भाव यामुळे शेतकºयांच्या संकटात भर पडत आहे.
द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असलेल्या निफाड तालुक्यातील काही भागातील पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.
द्राक्ष बागा वाचविण्यासाठीचे प्रयत्न....
अतिथंडी, गारवारे, दवबींदु, ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांवर द्राक्षमण्यांना पाणी देणे, महागडी औषधे फवारणी, तापमान टिकविण्यासाठी द्राक्षबागांमध्ये धुर करणे, बागांवर कागद, साडी, अच्छादणे टाकली जात आहे. थंडीचा फायदा गव्हू, कांदा, हरभरा आदी रब्बी पिकांना होत आहे.
धुक, थंडी, वारा, ढगाळ वातावरणामुळे पिक वाचिवण्यासाठी शेतकर्यांचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. त्यात पडणारा पाऊस या सर्व बदलांमुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिसकावला जाण्याची भीती निर्माण झालेली आहे. सद्या बर्याच द्राक्ष बागांमध्ये द्राक्षांच्या मण्यांमध्ये साखर उतरत आहे. त्यामुळे ते तडकण्याचे प्रमाणे वाढते आहे. वातावरणातील सततच्या बदलामुळे निर्यातक्षम द्राक्षांच्या भावात मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे.
- वाल्मिक ठोंबरे, शेतकरी, रु ई.