कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 10:54 PM2020-01-23T22:54:01+5:302020-01-24T00:35:49+5:30

बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जात असून, यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे; मात्र ढगाळ हवामानामुळे कांदा खराब होत असून, महागडी औषधांची फवारणी करून कांदा वाचविण्याच्या प्रयत्नात बळीराजा दिसत आहे.

Influence of diseases on onion crop | कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव

कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव

googlenewsNext
ठळक मुद्देवटार : ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगाम संकटात; आर्थिक नियोजन कोलमडले


ओतूरला कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फवारणी करताना शेतकरी.


वटार : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जात असून, यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे; मात्र ढगाळ हवामानामुळे कांदा खराब होत असून, महागडी औषधांची फवारणी करून कांदा वाचविण्याच्या प्रयत्नात बळीराजा दिसत आहे.
जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. हे पीक तीन ते चार महिन्यात येत असल्याने नगदी पीक म्हणून याकडे शेतकरी पाहतात. चालूवर्षी सुरुवातीपासून चांगला बाजारभाव असल्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड होणार आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि बदलते हवामान पिच्छा सोडण्यास तयार नाही, परिणामी महागड्या औषधांची फवारणी करून कांदा पीक वाचविण्याच्या प्रयत्नात बळीराजा आहे.
कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे भाजीपाला पिकेही यावर्षी कवडीमोल भावात विकली जात असल्याने परिसरातील बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. सुरुवातीला चांगले वातावरण असल्यामुळे पिके जोमात होती; पण गेल्या दोन ते तीन दिवसापासून अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे ऐन जोमात असलेल्या कांदा पिकावर मावा, तुडतुडे, पिवळेपणा, गेंडा वाळणे असे
अनेक रोग येत असून, महागडी औषधांची फवारणी करावी लागत आहे.
पाच-सहा वर्षांपासून वरु णराजा रुसला होता. परिणामी परिसरात पाण्याचे मोठे संकट होते; पण यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने बागायती क्षेत्रात वाढ होऊन गहू, हरभरा पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून, वातावारणाचा फटका गव्हालाही बसत असून, विविध रोगाने गव्हाला ग्रासले आहे तर हरभरा पिकाला ऐन गाठे भरण्याच्या वेळेस अळई लागल्याने हरभºयाच्या उत्पन्नात घट होणार आहे. यावर्षासाठी शेतीचा रब्बी हंगाम उभा करण्यासाठी पैसा उपलब्ध नसल्याने शेतकरी मोडकळीस आला होता; पण व्याजाने व उसनावर पैसे घेऊन रब्बी हंगामातील पिकांची लागवड केली खरी; पण बदलत्या हवामानामुळे शेतकº्याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने पिके वाचविण्याचे बळीराजापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

महागड्या औषधांची फवारणी
महागडी औषधांची कांद्यावर फवारणी करीत आहे. या रोगराईमुळे या
वर्षी कांद्याचं उत्पादन घटणार आहे. दरवर्षी ओतूर परिसरात उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु या वर्षी सुरुवातीपासूनच नैसर्गिक आपत्तीस व रोगराई अशा संकटांना सामोरे जावे लागत आहे. यंदा उशिराने कांदा लागवड होत आहे. त्यातच ओतूर धरणाच्या पाणी गळतीमुळे फेब्रुवारी महिन्यातच नदी कोरडी पडते. परिणामास विहिरींचे पाणी तळ गाठते चालूवर्षी चांगला पाऊस
झाल्याने मार्च महिन्यापर्यंत थंडी राहील व पाणीही टिकेल, अशी आशा वाटते. मजूर टंचाईला यंदा सामोरे जावे लागले. बºयाच शेतकऱ्यांनी बाहेरगावांहून मजूर आणून लागवड ठेका पद्धतीने केली आहे. कांद्याला चांगले दर असल्याने महागडी रोपे आणूनही यंदा कांदा लागवडीत दरवर्षापेक्षा घट झाली आहे.

ओतूर परिसरातील शेतकरी हैराण
४ओतूर : परिसरात ढगाळ वातावरणाचा परिणाम होऊन कांदा पिकावर करपा व बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा हैराण झाला आहे. यावर्षी दोन -तीन वेळा उन्हाळ कांद्याची रोपे टाकूनही अवकाळी पावसामुळे ती खराब होऊन वाया गेली. त्यामुळे थोडीफार जगवलेली
रोपे व इतर ठिकाणांहून विकत आणलेली महागडी रोपे घेत कशीबशी लागवड केली; परंतु गेल्या आठ दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे सकाळी पडणारे धुके व दवबिंदू यामुळे करपा व भुरी रोगाने थैमान घातले आहे.

माझा दोन एकर कांदा लागवड करून दोन महिने झाले आहेत; पण बदलत्या हवामानामुळे कांद्यावर अनेक रोगांचा प्रादुर्भात होत आहे. महागडी फवारणी करूनही हवामान साथ देत नाही. बदलती शेती आणि पीक पद्धत जर बघितली तर शेती हासुद्धा बेभरवशाचा व्यवसाय झाला आहे. भांडवल टाकून पिके निघतील का नाही याचा भरोसा नाही.
- हरिष खैरनार, कांदा उत्पादक वटार

Web Title: Influence of diseases on onion crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.