टमाटा पिकावर फळमाशीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 04:12 PM2018-08-04T16:12:17+5:302018-08-04T16:15:08+5:30

शेतकरी चिंतेत : हाती आलेले पीक वाया जाण्याची भिती

 Influence of fruit fruit on Tomato crop | टमाटा पिकावर फळमाशीचा प्रादुर्भाव

टमाटा पिकावर फळमाशीचा प्रादुर्भाव

googlenewsNext
ठळक मुद्देखामखेडा , सावकी, भऊर, पिळकोस, भादवन आदी भागामध्ये टमाटा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन चालू वर्षी जून व जुलै महिन्यात टमाटाच्या भावा मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा परिसरातील टमाटा पिकावर फळमाशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
खामखेडा , सावकी, भऊर, पिळकोस, भादवन आदी भागामध्ये टमाटा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परराज्यातील बाजारपेठांमध्ये या गावांचे नाव असल्याने व्यापारी थेट शेतक-यांच्या बांधावर माल खरेदीसाठी येतात. त्यामुळे येथील स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध होतो. चालू वर्षी जून व जुलै महिन्यात टमाटाच्या भावा मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. त्यावेळेस टमाटाची चांगल्या प्रमाणात आवक होती. परंतु बाजारभाव नसल्याने शेतक-यांच्या हाती काहीच  नव्हते. तरीही शेतक-यांनी हिमतीने टमाटयाची लागवड मोठ्या प्रमाणात ेकेली. जून महिन्यात टमाट्याची लागवड केल्यावर आॅगस्टमध्ये तो काढणीस येतो. तेव्हा त्यास भाव चांगला भाव मिळतो. आता टमाट्याच्या भावातही चांगल्यापैकी वाढ झाली आहे. टमाट्याचे पीक चांगल्यापैकी आहे. परंतु त्यात फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्याने टमाटे कच्चे असतांना सडू लागले आहे. फळमाशीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी महागड्या अशा औषधांची फवारणी करीत आहेत. टमाटा पिकावर शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. पिकावर केलेला खर्च भरून निघतो कि नाही याची भिती शेतक-यांमध्ये निर्माण झाली आहे.

Web Title:  Influence of fruit fruit on Tomato crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक