पंचवटी परिसरात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:41 PM2018-08-31T22:41:42+5:302018-09-01T00:18:48+5:30

गेल्या अनेक महिन्यांपासून पंचवटी परिसरात वाघाडी नाल्याची स्वच्छता न केल्याने दुर्गंधीचे वातावरण पसरले असून, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

Influence of pandemic diseases in Panchavati area | पंचवटी परिसरात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव

पंचवटी परिसरात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव

googlenewsNext

नाशिक : गेल्या अनेक महिन्यांपासून पंचवटी परिसरात वाघाडी नाल्याची स्वच्छता न केल्याने दुर्गंधीचे वातावरण पसरले असून, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे साथीच्या आजारात वाढ झाली आहे. परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे. मनपा प्रशासनाच्या वतीने वाघाडी नाल्याची सफाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.  वाघाडी नाल्यात सध्या केरकचरा तसेच गाजर गवत साचलेले आहे. या नाल्यातून सांडपाणी वाहत असल्याने परिसरातून ये-जा करणाºया नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो याशिवाय उघड्या झाल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्याचे नागरिकांनी सांगितले नाल्यांची साफसफाई होत नसल्याने व औषध फवारणी होत नसल्याने डासांमुळे डेंग्यूसारखे आजार उद्भवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहरात डेंग्यूसदृश आजाराचे रु ग्ण वाढलेल्या असताना आता उघड्या नाल्यांमुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे.

Web Title: Influence of pandemic diseases in Panchavati area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.