द्राक्षबागांवर करपा, डावणीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 10:23 PM2019-10-31T22:23:44+5:302019-10-31T22:25:08+5:30
ओझर : निफाड तालुक्यातील गोदाकाठच्या करंजगाव, ओझर, पिंपळगाव, सुकेणा, पालखेड, शिंगवे, म्हाळसाकोरे, भुसे परिसरासह उगाव-शिवडी, खेडे, वनसगाव, सारोळे, नांदुर्डी, सोनेवाडी, नैताळे, रामपूर, कोळवाडी, शिवरे या गावांत विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील द्राक्षबागांसह इतर पिकांचे गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने नुकसान केले आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार अनिल कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोमवारी सायंकाळी निफाड तालुक्यात सुमारे सव्वा तासाहून अधिक काळ पावसाचा जोर होता. या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादकांना बसत आहे. सद्यस्थितीत द्राक्षबागांच्या छाटणीनंतर द्राक्षबागा पोंगा व फुलोरा अवस्थेत आहे. या अवस्थेत सतत पाऊस होत असल्याने द्राक्षबागेच्या पानांवर व घडांवर करपा, डावणी यासारखे रोग बळावत आहेत. फुलोºयातील द्राक्षमण्यांची गळ अन् घडकूज या पावसाने होत आहे. महिनाभरापासून सतत पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश न मिळाल्याने द्राक्षबागांत असलेल्या मुळ्या बंद पडत आहे. त्याचा परिणाम थेट ओलांड्यावर फांदीला मुळ्या फुटत आहे. नवीन द्राक्षमाल जिरण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा देणे गरजेचे आहे. त्वरित पंचनामे करावे, अशी मागणीही कदम यांनी केली आहे.