कळवणला विद्यार्थ्यांना आॅनलाइन गृहपाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 11:06 PM2020-03-19T23:06:48+5:302020-03-20T00:05:41+5:30

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालय ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे ऐन परीक्षा काळात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्र म मागे राहू नये, शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कळवण शहरातील आरकेएम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शिक्षकांनी तयार केलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून आॅनलाइन गृहपाठ घेतला जात आहे.

Inform students online homework | कळवणला विद्यार्थ्यांना आॅनलाइन गृहपाठ

कळवणला विद्यार्थ्यांना आॅनलाइन गृहपाठ

Next
ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

कळवण : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालय ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे ऐन परीक्षा काळात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्र म मागे राहू नये, शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कळवण शहरातील आरकेएम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शिक्षकांनी तयार केलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून आॅनलाइन गृहपाठ घेतला जात आहे.
कोरानाच्या पार्श्वभूमीवर आरकेएम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बंद असले तरी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांचे प्रश्नसंच तयार करून ग्रुपवर अपलोड केले जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून डिजिटल पर्याय अवलंबून ३० वर्गांतील २३०० विद्यार्थ्यांना प्रश्नसंच आॅनलाइन दिले जात आहेत. ३१ मार्चपर्यंत शाळा बंद असल्याने आरकेएम विद्यालयातील विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता यावा यासाठी इयत्ता पाचवी ते नववी व ११वीच्या सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट, ईमेल, जीमेलच्या माध्यमातून प्रत्येक वर्ग, तुकडीसाठी वेगवेगळ्या विषयांचे प्रश्नसंच तयार करण्यात येत आहेत आणि ते विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अपलोड केले जात आहेत. त्यासाठी सर्व वर्ग तुकडीतील विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले असल्याचे प्राचार्य एल. डी. पगार यांनी सांगितले. विद्यालयाचे तंत्रस्नेही शिक्षक डी. बी. गावीत व बी. पी. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली.
सुट्टीच्या कालावधीत वार्षिक परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांचे अभ्यासात सातत्य राहावे, त्यांची पूर्वतयारी व्हावी यासाठी विविध विषयांचे प्रश्नसंच गूगल फॉर्म, डब्ल्यू पीएफ, वर्ड या डिव्हॉइसचा वापर करून अपलोड केले जात आहेत व विद्यार्थ्यांचा रोजचा प्रतिसाद घेतला जात आहे.
विद्यार्थ्यांना पुढील महिन्यात परीक्षांना सामोरे जायचे आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावर कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पालकांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून विद्यार्थ्यांना प्रश्नसंच सोडविण्यासाठी दिले जात आहेत. तसेच पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला जात आहे. - एल. डी. पगार, प्राचार्य

Web Title: Inform students online homework

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.