कळवणकरांना मिळणार अखंडित वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:15 IST2020-07-26T21:33:32+5:302020-07-27T00:15:02+5:30
कळवण : शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, शहरवासीयांना मूलभूत सुविधा कमी पडून नये, तसेच अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील वीज वितरणव्यवस्थेचे गणेशनगर व शिवाजीनगर असे विभाजन करून स्वतंत्र वीज वितरणव्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे.

कळवणकरांना मिळणार अखंडित वीज
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, शहरवासीयांना मूलभूत सुविधा कमी पडून नये, तसेच अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील वीज वितरणव्यवस्थेचे गणेशनगर व शिवाजीनगर असे विभाजन करून स्वतंत्र वीज वितरणव्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे.
पूर्वी शहरातील वीज वितरण व्यवस्था एकाच ११ केव्ही लाइनद्वारे केली जात होती. एकच ११ केव्ही वाहिनी पूर्ण शहरात असल्याने कुठलेही देखभाल, दुरुस्तीच्या कामामुळे किंवा वितरण व्यवस्थेमध्ये कोणताही बिघाड झाल्यास संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित केला जात होता. शहराची वाढती लोकसंख्या, वाढलेला परिसर आणि वाढलेली विजेची मागणी तसेच ग्राहकसंख्येमुळे सुरळीत वीजपुरवठा होत नव्हता. यामुळे तक्रारींमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे वीज वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आमदार नितीन पवार आग्रही होते.
आढावा व नियोजन बैठकीत वीज वितरणव्यवस्थेबाबत आमदार पवार सतत विचारणा करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात सूचना करीत होते. महावितरणचे कार्यकारी अभियंता टेंभुर्णे व उपकार्यकारी अभियंता अंबाडकर यांनी याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे
प्रस्ताव सादर करून वीज वितरणव्यवस्थेचे नियोजन करण्याचे आश्वासन आमदार पवार यांना दिले
होते.शहराच्या दोन भागात वाहिनीची विभागणीवरिष्ठ कार्यालयाने किमान उपकरणे व साहित्य वापरून कमीतकमी खर्चात वीज वितरणची दोन भागात विभागणी करून शहरात वीजपुरवठा करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार शहरात गणेशनगर व शिवाजीनगर हे दोन मुख्य भाग करण्यात आले असून, वीज वितरण वाहिनीचीही विभागणी करण्यात आली आहे. वीजपुरवठा काही काळ खंडित झाला तर नागरिक अस्वस्थ होतात. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऊन-पाऊस व थंडीत विजेच्या खांबावर चढून काम करणे अवघड आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी कळवणकरांना वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विभाजनाचे जोखमीचे काम महावितरणच्या यंत्रणेने केल्यामुळे सुरळीत वीजपुरवठा मिळणार आहे.
- कौतिक पगार, गटनेते, कळवण पालिका