निवडणुकीसाठी कोणत्याही राजकीय पक्षांच्या चिन्हांचा वापर करता येणार नसल्याची माहिती
By admin | Published: December 8, 2014 01:58 AM2014-12-08T01:58:46+5:302014-12-08T01:59:12+5:30
निवडणुकीसाठी कोणत्याही राजकीय पक्षांच्या चिन्हांचा वापर करता येणार नसल्याची माहिती
देवळाली कॅम्प : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ११ जानेवारी २०१५ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी कोणत्याही राजकीय पक्षांच्या चिन्हांचा वापर करता येणार नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व नाशिकचे प्रांत रमेश मिसाळ यांनी दिली.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणूक निर्णय अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पत्रकार व विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना मिसाळ यांनी विविध शंकांचे निरसन केले. कॅन्टोन्मेंट निवडणूक कायद्यातील तरतुदीनुसार राजकीय पक्षांचे चिन्ह वापरण्यात येत नसून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कायद्यानुसार सर्वांना निवडणुकीत सहभागी होता यावे, या उद्देशाने कॅन्टोन्मेंट निवडणुकीसाठी ८५ चिन्हांचे नियोजन करण्यात आले आहे.मतपत्रिकांपेक्षा मशीनचा वापर व पॅनलला एकच निशाणी देण्याची मागणी यावेळी विविध इच्छुकांनी केली. याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. यावेळी दिनकर आढाव, दत्तात्रय सुजगुरे, सुरेश कुसाळकर, राजाभाऊ चौधरी, संजय गोडसे, अनिल निसाळ, त्र्यंबक मेढे, बाळा कडभाने, ज्ञानेश्वर शिंदे आदिंसह सायमन भंडारे उपस्थित होते. (वार्ताहर)