आधारसंलग्न नसलेल्या खात्यांची माहिती आज होणार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 12:50 AM2020-01-07T00:50:24+5:302020-01-07T00:51:14+5:30

नाशिक : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या आधारकार्ड संलग्न बॅँक खात्यातच होणार असल्याने कर्जदार शेतकºयांना याचा लाभ मिळावा यासाठी ‘आधार’संलग्न नसलेल्या बॅँक खात्यांची माहिती संकलित करण्याचे कामकाज युद्धपातळीवर सुरू झाले आहे. जिल्हा आणि अन्य सरकारी बॅँकाच्या खात्यांची माहिती यांची सांगड घालण्याची प्रक्रिया बॅँका आणि जिल्हा प्रशासनाला घालावी लागत आहे.

Information on non-linked accounts will be announced today | आधारसंलग्न नसलेल्या खात्यांची माहिती आज होणार जाहीर

आधारसंलग्न नसलेल्या खात्यांची माहिती आज होणार जाहीर

Next
ठळक मुद्देशेतकºयांच्या खात्यावर थेट रक्कम जमा केली जाणार आहे.

नाशिक : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या आधारकार्ड संलग्न बॅँक खात्यातच होणार असल्याने कर्जदार शेतकºयांना याचा लाभ मिळावा यासाठी ‘आधार’संलग्न नसलेल्या बॅँक खात्यांची माहिती संकलित करण्याचे कामकाज युद्धपातळीवर सुरू झाले आहे. जिल्हा आणि अन्य सरकारी बॅँकाच्या खात्यांची माहिती यांची सांगड घालण्याची प्रक्रिया बॅँका आणि जिल्हा प्रशासनाला घालावी लागत आहे.
शेतकºयांसाठी जाहीर करण्यात आलेल्या कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाखांचे कर्ज असलेल्या शेतकºयांच्या खात्यावर थेट रक्कम जमा केली जाणार आहे. परंतु त्यासाठी बॅँक खात्याला आधारकार्ड संलग्न असणे अपेक्षित असल्याने या संदर्भातील माहिती जाहीर करण्यासाठी राज्य शासनाने ७ जानेवारीची मुदत दिली आहे. त्यानुसार या कामाला वेग आला असून, मंगळवार (दि.७) रोजी सायंकाळपर्यंत ‘आधार’संलग्न नसलेल्या बॅँक खात्यांची माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे.
खात्यातच रक्कम जमा होणार असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्हा तसेच राष्टÑीयीकृत, सहकारी बॅँकामधील कर्जखात्याची माहिती संकलित करण्याचे आदेश बॅँकांना दिले आहेत. त्यानुसार माहिती अपलोड करण्यासदेखील प्रारंभ झालेला आहे. जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच योजनेचा लाभ मिळावी यासाठी शासनाने आदेशित केले आहे. पीक कर्जाचीच माहिती द्यावीकर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी बॅँकांनी केवळ पीक कर्जाचीच यादी सादर करणे अपेक्षित आहे. अन्य कारणांसाठी घेतलेले कर्ज पीक कर्ज म्हणून दाखविण्याचा प्रयत्न करणाºयांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला दिलेले आहेत. दरम्यान, पीक कर्जदारात जास्तीत जास्त शेतकरी हे जिल्हा बॅँकेचे कर्जधारक असून, उर्वरित राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बॅँकेचे कर्जधारक आहेत.

Web Title: Information on non-linked accounts will be announced today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.