मूलभूत सुविधांची वानवा असलेला परिसर

By admin | Published: November 5, 2016 12:30 AM2016-11-05T00:30:07+5:302016-11-05T00:47:09+5:30

मूलभूत सुविधांची वानवा असलेला परिसर

Infrastructure-based infrastructure | मूलभूत सुविधांची वानवा असलेला परिसर

मूलभूत सुविधांची वानवा असलेला परिसर

Next

मनमाड : शहरातील प्रभाग क्र्र्रमांक दहामध्ये जमदाडे चौक, ५२ नंबर, फुले चौक परिसर, गुरुद्वारा परिसर, गवळी वाडा, झोपडपट्टी, भगतसिंग मैदान, ललवाणी बिल्डिंग, गणेश कुंड, नेहरू भवन मागील शाळा, हादगे बिल्डिंग, धात्रक आॅफिस, शिवाजी पुतळा, चौरसिया पान दुकान, रेल्वे स्टेशन हद्द, जुना आयओसी डेपो, गायकवाड चौक, मोहंमदिया मशीद आदि भागाचा समावेश आहे. हा प्रभाग अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण गटाच्या उमेदवारासाठी राखीव आहे. या प्रभागाची लोकसंख्या ५४६४ असून, मतदारसंख्या ४२३४ इतकी आहे. यामध्ये २२३२ पुरुष व २००२ महिला उमेदवारांचा समावेश आहे. शहरातील मुख्य गावठाण लगतचा हा परिसर असून, रेल्वे लाइनजवळील काही भाग या प्रभागात येतो. प्रभागात दोन समाजमंदिर बांधण्यात आली आहेत. भुयारी गटारी, रस्ते आदि विकासकामे झाली आहेत. या भागाला सध्या शिवाजी चौकातील पाण्याच्या टाकीवरून पाणीपुरवठा करण्यात येतो. येथील गायकवाड चौकात पाण्याची नवीन टाकी बांधण्यात आली असून, यामुळे प्रभागात पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होणार आहे. (वार्ताहर) स्वच्छतेचा व आरोग्याचा प्रश्न इतर प्रभागाप्रमाणे या प्रभागातसुद्धा अनेकवेळा निर्माण होत असतो. (वार्ताहर)

Web Title: Infrastructure-based infrastructure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.