येवल्यात शेतकरी मारहाण प्रकरणी निषेध सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:40 AM2018-03-06T01:40:55+5:302018-03-06T01:40:55+5:30
कांदा व्यापाºयाने शेतकºयाला मारहाण केल्याप्रकरणी सोमवारी बाजार समितीच्या आवारात तालुक्यातील अनकुटे येथील शेतकºयांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, स्वाभिमानी रिपब्लीकन पक्ष, यांनी आयोजीत केलेल्या निषेध सभेत बाजार समितीने देखील निषेधाचा सूर लावत संबंधीत व्यापाºया विरोधात दाखल केलेल्या तक्र ारीचे समर्थन केले.
येवला : कांदा व्यापाºयाने शेतकºयाला मारहाण केल्याप्रकरणी सोमवारी बाजार समितीच्या आवारात तालुक्यातील अनकुटे येथील शेतकºयांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, स्वाभिमानी रिपब्लीकन पक्ष, यांनी आयोजीत केलेल्या निषेध सभेत बाजार समितीने देखील निषेधाचा सूर लावत संबंधीत व्यापाºया विरोधात दाखल केलेल्या तक्र ारीचे समर्थन केले. याप्रकरणी निषेध सभेत सर्वांनीच आक्र मक भूमीका घेतल्याने वाल्मिक गायकवाड या शेतकºयास मारहाण करणाºया बाळू सानप व इतरांवर दखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. कोणत्याही शेतकºयावर असा प्रसंग येवू नये अशी भूमिका मांडण्यात आली. अनकुटे येथील शेतकºयांनी आयोजीत केलेल्या निषेध सभेसाठी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. बाजार समितीच्या आवारात शेतकरी तसेच जिल्ह्यातून आलेल्या विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी,आणि बाजार समितीचे संचालक यांनी घटनेचा निषेध व्यक्त केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश युवा अध्यक्ष हंसराज वडघुले , उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार यांनी आपली भूमिका मांडली. जेष्ठ नेते माणीकराव शिंदे आणि पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. याबाबत संबंधीत स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार संघटना यांच्या निवेदनाबाबत सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, येवला यांनी यावेळी चर्चा करु न लेखी स्वरु पात संघटना प्रतिनीधींना आश्वासन दिले. त्यानंतर निषेध आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबत येवला सहाय्यक निबंधक यांना कृषी उत्पन्न बाजार समितीने घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली असून मारहाण करणारा व्यापारी येवला बाजार समितीचा परवानेधारक नाही. त्यामुळे सदरच्या मारहाणीच्या घटनेशी बाजार समितीचा संबंध नाही हे वक्तव्य सचीव डी. सी. खैरनार यांनी वस्तुस्थितीनुसार केले होते. परंतु या वक्तव्यामुळे काही शेतकरी वर्गाचे मन दुखावले म्हणून त्यांनी दिलगीरी व्यक्त केली. सदरच्या घटनेचे भांडवल करीत बाजार समिती व शेतकºयांबद्दल चुकीचा संदेश जाऊ नये ही अपेक्षा व्यक्त करीत या निषेध आंदोलनाच्या परीस्थीतीत कांदा लिलाव बंद करण्याचा अथवा त्यात अडथळा आणण्याचा येवल्यातील शेतकºयांनी प्रयत्न केला नाही. त्याबद्दल त्यांचे आभार मानले. व्यापारी वर्गानेही संपूर्ण कांदा लिलाव पूर्ण केला. या निषेध सभेत अनकुटे येथील ग्रामस्थांसह ,स्वाभिमानी शेतकरी संघटनासह शेतकरी सहभागी झाले होते.
बाजार समितीकडे तक्रार करावी
शेतकºयांनी कांदा लिलावानंतर काट्यावर वांधा निर्माण झाल्यास बाजार समितीकडे तक्र ार करत सदरचा वांधा समितीकडून सोडवावा, परस्पर व्यापारी व शेतकºयांनी तक्र ार करु नये असे आवाहन सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळाच्या वतीने शेतकºयांना करण्यात आले आहे.