कळवण बाजार समितीने कांदा लिलाव तात्काळ सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 04:49 PM2020-10-26T16:49:49+5:302020-10-26T16:52:10+5:30

कळवण : केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर दोन टनापर्यंत मर्यादा घातल्याने या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांदा व्यापारी बांधवानी बेमुदत संप सुरु केला आहे. त्यामुळे कळवणसह जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बेमुदत बंद आहे. कळवण कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीने कांदा लिलाव तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी राज्य कांदा उत्पादक संघटनेने केली आहे याबाबत कळवण बाजार समितीला निवेदन दिले.

Initiate onion auction immediately by Kalvan Market Committee | कळवण बाजार समितीने कांदा लिलाव तात्काळ सुरू करा

कळवण बाजार समितीने कांदा लिलाव तात्काळ सुरू करा

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

कळवण : केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर दोन टनापर्यंत मर्यादा घातल्याने या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांदा व्यापारी बांधवानी बेमुदत संप सुरु केला आहे. त्यामुळे कळवणसह जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बेमुदत बंद आहे. कळवण कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीने कांदा लिलाव तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी राज्य कांदा उत्पादक संघटनेने केली आहे याबाबत कळवण बाजार समितीला निवेदन दिले.
केंद्र सरकारने कांद्याच्या होलसेल साठी 25 टनाची व किरकोळ साठी 2 टनाची साठ्याची मर्यादा घालून दिल्याने बाजार समित्यांनी व्यापारी अर्जानुसार लिलावाचे कामकाज बंद ठेवले आहे.
परंतु सध्या दिवाळीचा सण तोंडावर आल्याने आणि शेतीच्या नवीन हंगाम उभा करण्यासाठी शेतकऱ्यांना भांडवलाची गरज असतांना तसेच चाळींमधला कांद्याचे सडण्याचे प्रमाण वाढत असल्याने बेमुदत बाजार समित्यांचे कामकाज बंद राहिल्यास जेव्हा बाजार समित्यांचे कामकाज सुरू होईल तेव्हा कांद्याची एकदम आवक होऊन कांद्याच्या बाजार भावात मोठी घसरण होऊन शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होईल
कांदा उत्पादकांचे हे नुकसान टाळण्यासाठी 27 ऑक्टोबर 2020 पासून तात्काळ आपल्या कळवण कुषि उत्पन्न बाजार समितीचे व उपबाजार समितीचे कामकाज सुरू करावे अशी मागणी तालुकाध्यक्ष विलास रौदळ तालुका उपाध्यक्ष मुन्ना पगार, तालुका संघटक राजेश्वर शिरसाठ, तालुका सह संघटक प्रल्हाद गुंजाळ, तालुका सरचिटणीस युवराज वाघ, तालुका प्रसिद्धी प्रमुख विजय पाटील, तालुका युवा अध्यक्ष मयूर पाटील यांनी केली.

कळवण बाजार समितीचे जनसंपर्क अधिकारी अतुल पगार यांना निवेदन देतांना विलास रौदळ, मुन्ना पगार, तालुका संघटक राजेश्वर शिरसाठ, प्रल्हाद गुंजाळ, युवराज वाघ, विजय पाटील, मयूर पाटील.
 
Web Title: Initiate onion auction immediately by Kalvan Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.