दीक्षाग्रहण समारंभ; वणीत विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 10:53 PM2017-11-26T22:53:13+5:302017-11-27T00:33:34+5:30
दिंडोरी तालुक्यातील व वणी येथील व्यापारी कुमारपाल बोरा यांच्या कन्या अमृता बोरा या सोमवार, दि. ४ डिसेंबर रोजी गुजरात येथील पालीताना तीर्थक्षेत्री जैन धर्मशास्त्राप्रमाणे दीक्षा घेणार आहेत. यानिमित्त वणी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वणी : दिंडोरी तालुक्यातील व वणी येथील व्यापारी कुमारपाल बोरा यांच्या कन्या अमृता बोरा या सोमवार, दि. ४ डिसेंबर रोजी गुजरात येथील पालीताना तीर्थक्षेत्री जैन धर्मशास्त्राप्रमाणे दीक्षा घेणार आहेत. यानिमित्त वणी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अमृता बोरा यांचे शिक्षण बीएस्सी, एमबीए आहे. धर्मक्षेत्रात अग्रेसर असणाºया अमृता यांनी मोहरूपी संसाराचा त्याग करून दीक्षा घेण्याचा मनोदय व्यक्त केला. जैन महासती प. पू. तरुलताश्रीजी यांच्या सुशिष्या देवांशी पुण्याश्रीजी व वर्तमान गच्छाधिपती आचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी यांच्या सान्निध्यात हा दीक्षा समारोह संपन्न होणार आहे. या समारंभास अहमदाबाद येथील नामवंत कलाकार, संगीतकार उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी (दि. ३०) सकाळी ९ वाजता संभवनाथ जैन मंदिर येथे पंच कल्याणक महापूजा, दुपारी ३ वाजता गृहत्यागचा कार्यक्रम होईल. त्यानंतर दि. ४ डिसेंबर २०१७ रोजीपर्यंत होणारे सर्व कार्यक्र म पालीताना तेथे होणार आहेत. या सोहळ्यास समाजबांधवांनीे उपस्थित राहावे, असे आवाहन हर्षद बोरा, कुमारपाल बोरा, हितेश बोरा यांनी केले आहे.
उद्या भक्तिसंध्या
मंगळवारी (दि. २८) महिला भक्तिसंध्या, बुधवारी (दि . २९) सकाळी ९ वाजता कुंकूमचा कार्यक्रम होणार आहे. जैन संत प. पू. मैत्री भूषण विजयजी व मुक्तिभूषण विजयजी यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्र- गुजरात राज्याच्या भाविकांच्या साक्षीने अमृता यांची वणी शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. संध्याकाळी बिदाईचा कार्यक्रम होईल अशी माहिती देण्यात आली.