नरेंद्र महाराजांकडून साधकांना दीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:52 PM2019-11-20T23:52:14+5:302019-11-20T23:53:03+5:30

मनुष्याने मरेपर्यंत संसारात राहून सतत देवाचे नामस्मरण अंत:करणापासून घेतले पाहिजे. मनुष्याने संसार करून परमार्थ साधावा. संसार फाटक्या गोणपाटसारखा असून, त्यात कोणतीही वस्तू टाकली तरी ती खाली पडते. संसारात अपेक्षा वाढतात. संसारात सुख मिळेलच असे नाही.

 Initiation for seekers from Narendra Maharaj | नरेंद्र महाराजांकडून साधकांना दीक्षा

नरेंद्र महाराजांकडून साधकांना दीक्षा

googlenewsNext

पंचवटी : मनुष्याने मरेपर्यंत संसारात राहून सतत देवाचे नामस्मरण अंत:करणापासून घेतले पाहिजे. मनुष्याने संसार करून परमार्थ साधावा. संसार फाटक्या गोणपाटसारखा असून, त्यात कोणतीही वस्तू टाकली तरी ती खाली पडते. संसारात अपेक्षा वाढतात. संसारात सुख मिळेलच असे नाही. संसारात सुख निर्माण व्हावे यासाठी आध्यात्मात आले पाहिजे. ज्याला अध्यात्म शिकायचे आहे त्याने साधक दीक्षा घ्यावी, असे मत अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी साधकांना मार्गदर्शन करताना केले.
आशेवाडी जवळील जनम संस्थानच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठ आश्रमात अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे समस्या मार्गदर्शन आणि प्रवचन दर्शन सोहळा आयोजित केला होता त्याप्रसंगी ते बोलत होते.
साधक दीक्षेचे महत्त्व सांगताना ते पुढे म्हणाले की, अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यासाठी भक्तांनी साधक दीक्षा घ्यावी. विज्ञान आणि ज्ञान यांची सांगड साधक दीक्षेत घातली जाते. त्यामुळे जीवन हे सुखकर होते. पुण्य वाढले की मोक्ष मिळतो असा आपला समज आहे. त्या कारणाने प्रत्येक जण पुण्य मिळवण्यासाठी धडपड करत असतो. पुण्य समजून घेण्यासाठी भक्तांनी साधक दीक्षा घ्यावी. साधक दीक्षा घेतल्यानंतर साधकाने काही पथ्य पाळावयाची आहेत. त्यात त्यांनी कोणालाही फसवायचे नाही, व्यसन करायचे नाही, खोटे बोलायचे नाही, मनातही कोणाबद्दल वाईट चिंतायचे पाहिजे नाही, असे ते शेवटी म्हणाले.
नाशिक जिल्ह्यासह नंदुरबार, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर तसेच इतर जिल्ह्यातून भक्तांनी दर्शनासाठी तसेच समस्येवर मार्गदर्शन मिळावे यासाठी गर्दी केली होती. यावेळी ३१५ नवीन साधकांना स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांनी साधक दीक्षा दिली.

Web Title:  Initiation for seekers from Narendra Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.