कोरोनामुक्त शहर करण्यासाठी सेवाभावी संस्थांचा पुढाकार गरजेचा : सुनील कडासने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 02:38 PM2020-07-23T14:38:50+5:302020-07-23T14:39:16+5:30
मनमाड : शहर आणि परिसरात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासन आणि वैद्यकीय क्षेत्राबरोबर सेवाभावी संस्था आण िसंघटनानीही प्रत्येक घराघरात पोहचणे आवश्यक आहे.
मनमाड : शहर आणि परिसरात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासन आणि वैद्यकीय क्षेत्राबरोबर सेवाभावी संस्था आण िसंघटनानीही प्रत्येक घराघरात पोहचणे आवश्यक आहे. कोरोनामुळे जग त्रस्त झाले आहे त्याविरु द्ध लढण्यासाठी सर्व ती काळजी घेण्याची आणि वैद्यकीय क्षेत्रातील उपचाराची गरज आहे. हा आजार लपवु नका आपण सुरिक्षत रहा आण िआपले कुटुंबही सुरिक्षत ठेवा प्रचार प्रसार आण िकायद्याचे पालन करा असे आवाहन कोविड १९ साठी मालेगाव येथे नियुक्त केलेले विशेष कार्यकारी अधिकारी तथा समनव्यक सुनील कडासने यांनी केले.
मनमाड नगरपालिकेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात कडासने यांनी शहरातील विविध घटकाशी मुक्त संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कसा रोखता येईल याबाबत चर्चा करण्यासाठी कडासने यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील प्रमुख डॉक्टर इंजिनिअर व्यापारी वकील लोकप्रतिनिधी व शहरातील मान्यवरसोबत संवाद कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले होते .मालेगावचे डॉ साजिद अहमद व डॉ फारूक शेख,डॉ प्रवीण शिंगी ,डॉ जी एस नरवणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी उपनगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे ,शिवसेनेचे गटनेते गणेश धात्रक, शहरप्रमुख मयूर बोरसे ,नगरसेवक गंगाभाऊ त्रिभुवन, संतोष बळीद ,उद्योजक अजित सुराणा, राजाभाऊ पारीक, डॉ सुनील बागरेचा, सुनील पाटील आदी उपस्थित होते.प्रशासन अधिकारी राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले.