त्र्यंबकेश्वर तालुक्यात देवस्थानांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 09:37 PM2020-05-04T21:37:11+5:302020-05-04T22:59:39+5:30
त्र्यंबकेश्वर (वसंत तिवडे) : तालुक्यात सुदैवाने कोरोनाचा शिरकाव झालेला नसला तरी कधी कोरोना संशयित येतील अथवा कोरोनाबाधित येतील याची खात्री नाही. यासाठी तालुका प्रशासनाने खबरदारी म्हणून तालुक्यात ४ कोरोना केअर सेंटर तसेच त्र्यंबकेश्वरनजीक गजानन महाराज संस्थान येथे १ अशी पाच कोरोना केअर सेंटर यापूर्वीच स्थापन केली आहेत. तर श्रीस्वामी समर्थ गुरुपीठात कोरोना कोविड-१९ हेल्थ सेंटरची स्थापना करण्यात आली आहे.

ज्यांना कोरोनाची लक्षणे आढळतील अशा रुग्णांना या सेंटरमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सेंटर्समधूनच संशयिताच्या घशातील स्रावाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील. श्री स्वामी समर्थ गुरु पीठात शासनाच्या वतीने कोविड सेंटर स्थापन करण्यात आले आहे. येथे थेट कोरोनाबाधितांवर उपचार केले जाणार आहेत. खबरदारी म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, तालुक्यात २५३ परप्रांतीय नागरिक असून, यापैकी बहुतेकांची त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर बांधकामासह अन्य कामे सुरू झाल्याने काही परप्रांतीय त्र्यंबकेश्वर येथेच थांबणार असल्याचे समजते.
क्वॉरण्टाइन शेडसाठी ७० बेडचा हॉल गजानन महाराज संस्थानतर्फे उपलब्ध करून देण्यात आला आहे. येथे दाखल रुग्णांच्या वैद्यकीय सुविधेव्यतिरिक्त नास्ता, दुपारचे व संध्याकाळचे भोजन तसेच अन्य दैनंदिन विधीची व्यवस्था संस्थानतर्फेपुरविण्यात येणार आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील डॉक्टर्स, नर्स आदींना निवासव्यवस्थेसह चहा, नास्ता, भोजन सुविधा पुरविण्यात येत आहे.
तालुक्यात गरज पडल्यास रु ग्णांची गैैैैरसोय होऊ नये म्हणूुन शिरसगाव ह., बोरीपाडा, ब्रह्मा व्हॅली व भिलमाळ ही चार सेंटर तालुका प्रशासनाने यापूुर्वीच उभारली आहेत. पाच क्वॉरणटाइन सेंटर व एक कोरोना कोविड-१९ डेडीकेटेड हेल्थ सेंटरची स्थापना तहसीलदार दीपक गिरासे, उपजिल्हा रु ग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंदाकिनी बर्वे, पोलीस उपविभागीय अधिकारी भीमाशंकर ढोले, वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत लोंढे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश मोरे यांच्या उपस्थितीत पाहणी करून नंतरच स्थापन करण्यात आले आहेत.