ठाणगाव येथे जखमी गोमातेवर उपचार करून माणुसकीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 11:57 PM2019-11-05T23:57:09+5:302019-11-05T23:58:16+5:30
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे भटक्या जखमी गायीची शुश्रूषा करून पशुवैद्यकीय अधिकारी व जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भूतदयेचे दर्शन घडविले आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे भटक्या जखमी गायीची शुश्रूषा करून पशुवैद्यकीय अधिकारी व जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भूतदयेचे दर्शन घडविले आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ठाणगाव येथील भोर गल्ली परिसरात बऱ्याच दिवसांपासून एक भटकी गाय जखमी अवस्थेत पडून होती. तिला चाराही खाता येत नव्हता. गोमातेच्या पाठीवर भळभळती जखम दिसून येत होती. ही बाब लक्षात आल्यानंतर जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सी.एन. हजारी यांना याबाबत कल्पना देऊन उपचार करण्याची विनंती केली. डॉ. हजारी हेदेखील तत्काळ औषधोपचाराचे साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी योग्य पद्धतीने उपचार केल्यानंतर या जखमी गोमातेने उपचारांना प्रतिसाद दिला.
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या भूतदयेमुळे एका गोमातेचे आयुष्य सुकर झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी रामदास भोर, संदीप आमले, रमेश खोलमकर, सागर भोर, शांताराम शिंदे, संजय काकड, अवधूत भोर, यश आमले आदी उपस्थित होते.