जखमी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:52+5:302021-06-09T04:16:52+5:30
डोंगरगाव शिवारात बिबट्या जखमी अवस्थेत पडून असल्याचे मेंढपाळ व आसपासच्या शेतकऱ्यांना कळाल्यानंतर त्यांनी त्याची खबर सरपंच दयाराम सावंत यांना ...
डोंगरगाव शिवारात बिबट्या जखमी अवस्थेत पडून असल्याचे मेंढपाळ व आसपासच्या शेतकऱ्यांना कळाल्यानंतर त्यांनी त्याची खबर सरपंच दयाराम सावंत यांना दिली. सावंत यांनी वनविभागाचे वनपाल मोरे व वनसंरक्षक खरात यांना त्याची माहिती दिली. त्यानुसार वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दहीवड येथून पिंजरा उपलब्ध केला. रात्री ९ वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. सदर बिबट्या हा जखमी अवस्थेत आढळला. तो कंपाउंडमध्ये अडकल्यामुळे जखमी झाला असावा किंवा अन्य बिबट्या अथवा श्वानांशी त्याची झुंज झाली असावी, असा कयास व्यक्त केला जात आहे.
इन्फो
पुढील उपचार नाशिकला
बिबट्याच्या मानेला जखम झालेली असून, त्याला देवळा येथे वनविभागाच्या कार्यालयात पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिकला रवाना करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जखमी बिबट्याला पकडण्यासाठी सरपंच दयाराम सावंत तसेच वनविभागाचे मोरे, श्रीमती खरात, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लालजी सावंत, शिवसेनेचे देवळा तालुका संघटक बापू जाधव तसेच ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.
फोटो- ०७ डोंगरगाव बिबट्या
===Photopath===
070621\07nsk_43_07062021_13.jpg
===Caption===
फोटो- ०७ डोंगरगाव बिबट्या