‘रामशेज’वर मधमाशांच्या हल्ल्यात पर्यटक जखमी
By admin | Published: February 19, 2017 11:12 PM2017-02-19T23:12:31+5:302017-02-19T23:12:48+5:30
शिवजयंती : साजरी करण्यासाठी हजारो शिवप्रेमींची झाली होती गर्दी
पेठ : छत्रपती शिवाजी महाराज यांची साजरी करण्यासाठी नाशिक शहर व परिसरातून हजारो दुर्ग पर्यटक, स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी दिंडोरी तालुक्यातील रामशेज किल्ल्यावर पहाटेपासून मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती; मात्र अचानकपणे मधमाशांनी हल्ला केल्याने सर्वत्र एकच पळापळ होऊन धावपळ झाली. शिवजयंतीचे औचित्य साधून नाशिक शहरातील नामवंत डॉक्टर्स, सायकलिंग ग्रुप, ग्लोबल ग्रुप, सोशल नेटवर्किंग फोरम, वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थी मंच, नाशिक मेडिकोज यांच्यासह शहरातील नागरिकांनी रामशेज किल्ल्यावर शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी सात वाजेपासून पर्यटकांची गडाकडे आगेकूच सुरू झाली. यामध्ये पुरुष, स्त्रियांसह लहान बालकांचा व विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. डॉक्टरांनी तत्काळ आपापल्या हॉस्पिटलला फोन करून रु ग्णवाहिका मागविल्या तर काहींनी १०८ला कॉल केल्याने दहा मिनिटात रामशेजच्या पायथ्याशी सात-आठ रुग्णवाहिका दाखल झाल्या. माशांनी चावा घेतलेल्या रुग्णांवर जागेवर उपचार करण्यात आले. तर काहींना प्राथमिक उपचार करून रुग्णालयात हलविण्यात आले. (वार्ताहर)