रेस्क्यू आॅपरेशन करुन पकडलेल्या जखमी बिबट्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 04:38 PM2019-08-20T16:38:42+5:302019-08-20T16:39:09+5:30

सिन्नर : तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास येथे जखमी बिबट्याला वनविभागाने रेस्क्यू आॅपरेशन करुन जेरबंद केले. मात्र उपचारादरम्यान सदर जखमी बिबट्याचा मृत्यू झाला.

 Injured woman killed by rescue operation | रेस्क्यू आॅपरेशन करुन पकडलेल्या जखमी बिबट्याचा मृत्यू

रेस्क्यू आॅपरेशन करुन पकडलेल्या जखमी बिबट्याचा मृत्यू

Next

सिन्नर : तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास येथे जखमी बिबट्याला वनविभागाने रेस्क्यू आॅपरेशन करुन जेरबंद केले. मात्र उपचारादरम्यान सदर जखमी बिबट्याचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे डुबेरे शिवारात दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चास शिवारात बिबट्याचा मृत्यू झाल्याने प्राणीप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे. मंगळवारी पहाटे चास शिवारात बिबट्याने नांदूरशिंगोटे-चास रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर कोथंबिरीचे पीक असलेल्या शेतात बिबट्याने ठाण मांडल्याचे पाहिल्यानंतर चास ग्रामस्थांची एकच भंबेरी उडाली. त्यानंतर वनविभागाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर रेस्क्यू आॅपरेशन राबविण्यात आले. मंगळवारी पहाटे बिबट्या भाऊपाटील रख्मा खैरनार यांच्या ५५१ गटक्रमांकामध्ये ठाण मांडून बसला असल्याचे रस्त्याने ये-जा करणाºया ग्रामस्थांनी पाहिले. साई गौरव पेट्रोल पंपासमोर शेतात काम करणाºया शेतकऱ्यांनी बिबट्या पाहिल्यानंतर ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. खैरनार यांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली. खैरनार यांची शेती डोंगराच्या पायथ्याशी आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी या परिसरातील मोठी गर्दी केली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविण सोनवणे, वनपरिमंडळ अधिकारी प्रीतेश सरोदे, अनिल साळवे, आकाश रुपवते, रवींद्र गवळी, पी. बी. बिन्नर, बी. व्ही. तुपलोंढे, रोहित लोणारे, बालम शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या एकाच जागी बसलेला असल्याने तो जखमी असावा असा अंदाज वनविभागाच्या कर्मचाºयांनी केला. मात्र त्यानंतरही काळजी म्हणून रेस्क्यू आॅपरेशन राबविण्यात आले. बिबट्याला भूल देऊन जेरबंद करण्यात आले. त्यानंतर जखमी बिबट्याला मोहदरी वनउद्यानात आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एच. हळकुटे यांनी त्याच्यावर उपचार केले. मात्र बिब्टयाने उपचारास प्रतिसाद दिला नाही दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. बिबट्याला ताप होता, कावीळ होऊन तो जर्जर झाला होता. तसेच त्याच्या पोटात एक किलो वजनाचा गोळा निघाला. सदर गाठ कॅन्सरची असल्याची शक्यता वनविभागाच्या कर्मचाºयांनी व्यक्त केली. पोटाच्या आतील बाजूला जखमा आढळून आल्या. त्यामुळे आजारी बिबट्या चास शिवारात एका जागी ठाण मांडून बसला होता. मृत बिबट्या पाच ते सहा वर्षे वयाची मादी असल्याचे दिसून आले. पशुवैद्यकीय अधिकाºयांनी शवविच्छेदन केल्यानंतर मोहदरी वनउद्यानात मृत बिबट्याला अग्निडाग देण्यात आला. दोन दिवसात बिबट्या आणि दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याने पशुप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे.

Web Title:  Injured woman killed by rescue operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक