मागासवर्गीय समाजातील कर्मचाऱ्यांवर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 01:24 AM2018-10-29T01:24:41+5:302018-10-29T01:24:55+5:30
भारतातील मागासवर्गीय बहुजन समाजातील कर्मचाºयांवर वर्षानुवर्षे अन्याय होत असून, त्यांच्या अनेक समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, अशी खंत मूलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघाच्या परिसंवादात व्यक्त करण्यात आली.
नाशिक : भारतातील मागासवर्गीय बहुजन समाजातील कर्मचाºयांवर वर्षानुवर्षे अन्याय होत असून, त्यांच्या अनेक समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, अशी खंत मूलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघाच्या परिसंवादात व्यक्त करण्यात आली. गंजमाळ येथील रोटरी सभागृहात रविवारी (दि. २८) आयोजित परिसंवादाचे उद्घाटन आदिवासी विकास महामंडळाचे उपायुक्त प्रदीप पोळ यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त बी. जी. वाघ उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुष्पकराज दहिवलेकर उपस्थित होते.
यावेळी महाराष्टÑराज्य आदिवासी बचाव अभियानचे सचिव किसन ठाकरे, मंगेश खंबाईत, राज्य कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष उत्तमराव गांगुर्डे, एचएएलचे कामगार नेते राकेश गर्जे, किशोर शिंदे आदिंनी मागासवर्गीय, बहुजन आणि आदिवासी कर्मचाºयांच्या विविध समस्यांवर विचार मांडले. तसेच सरकारी धोरणाविषयी तीव्र निषेध करीत सुधारणाची मागणी केली. यावेळी किशोर तुपलोंढे यांनी प्रास्तविक केले. कार्यक्रमास रवींद्र महाले, एस. डी. किर्तीकर, एस. टी. जोगदंड, अशोक भालेराव, संजय पगारे, वैशाली गांगुर्डे आदि उपस्थित होते.