दुष्काळी तालुके जाहीर करण्यात कॉँग्रेसवर अन्याय?
By admin | Published: August 19, 2014 11:18 PM2014-08-19T23:18:56+5:302014-08-20T00:44:35+5:30
जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश
नाशिक : मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने राज्यातील १२३ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला खरा, त्यात नाशिक जिल्ह्णातील १५ पैकी अवघ्या तीन तालुक्यांचा समावेश असून, त्यातही कॉँग्रेसच्या एक व सहयोगी एक अशा दोघा आमदारांवर
अन्याय झाल्याची चर्चा कॉँग्रेसच्या वर्तुळात आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधितांनी संपर्क साधला असता जिल्ह्णातील केवळ तीन तालुक्यांचा या दुष्काळी तालुक्यांत समावेश असून, त्यात देवळा, नांदगाव व येवला तालुक्यांचा समावेश असल्याचे कळते. जिल्ह्णातील १५ पैकी आठ तालुक्यांची पावसाची यावर्षी सरासरी ५० टक्क्यांच्या वर असून, त्यात प्रामुख्याने नाशिक (७०.५३ टक्के), इगतपुरी (७०.६३), दिंडोरी (६९.९८), पेठ (५२.१४) त्र्यंबकेश्वर (५०.६८), कळवण (५५.१७), बागलाण (५२.६०), निफाड (५८.४०) अशी आहे. (प्रतिनिधी)
त्यात ५० टक्क्यांच्या आतील तालुक्यांमध्ये सर्वात कमी पाऊस नांदगाव (६.८७), येवला (२९.९९), देवळा (३४.९९) यांसह चांदवड (३७.४९), मालेगाव (४४.९२), सुरगाणा (४५.०९), सिन्नर (४४.७८) या सात तालुक्यांचा समावेश आहे. त्यातही येवला व नांदगाव येथे राष्ट्रवादीचे आमदार व पालकमंत्र्यांचाच मतदारसंघ असल्याने हे दोन तालुके दुष्काळी घोषित करण्यात आल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)