जातपडताळणीसाठी ‘सामाजिक न्याय’ विभागात कोरोना नियमावरच ‘अन्याय’; लागली रीघ (बातमी एकाखाली एक अशी दोन वेळा पेस्ट झाली आहे...)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:18 AM2020-12-30T04:18:50+5:302020-12-30T04:18:50+5:30
नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम आणि प्रवेशाची लगबग अशा दोन्ही कारणांसाठी संवर्गातील उमेदवार आणि विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असते. ...
नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम आणि प्रवेशाची लगबग अशा दोन्ही कारणांसाठी संवर्गातील उमेदवार आणि विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यामुळे सध्या सामाजिक न्याय विभाग तसेच आदिवासी विकास विभागात अर्ज दाखल करण्यासाठी या कार्यालयांमध्ये गर्दी होत आहे. हे अर्ज दाखल करण्यासाठी एकमेव खिडकी असल्याने जास्तीत जास्त वेळ उमेदवारांना रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. असे असतानाही संरक्षणाच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समाजकल्याण आणि आदिवासी विभागातील जातपडताळणी कार्यालयाबाहेर दिसत आहे.
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जातपडताळणी समितीचे प्रमाणपत्र किंवा पडताळणीसाठी प्रकरण सादर केल्याची पावती अर्जासोबत जोडणे अपेक्षित आहे. त्यामुळे निदान प्रकरण दाखल करण्यासाठी या दोन्ही कार्यालयांमध्ये सकाळपासूनच गर्दी झाली आहे. केवळ कार्यालयातच नव्हे तर कार्यालयाच्या बाहेरही कार्यकर्त्यांची गर्दी झाली असल्याने जणू येथे कोरोना नाही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. वास्तविक सर्वांनीच सुरक्षितता नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. परंतु, सामाजिक न्याय विभागात झालेल्या गर्दीवरून सुरक्षिततेची कुणालाही चिंता नसल्याचे दिसते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम आणि प्रवेशाची लगबग अशा दोन्ही कारणांसाठी संवर्गातील उमेदवार आणि विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यामुळे सध्या सामाजिक न्याय विभाग तसेच आदिवासी विकास विभागात अर्ज दाखल करण्यासाठी या कार्यालयांमध्ये गर्दी होत आहे. हे अर्ज दाखल करण्यासाठी एकमेव खिडकी असल्याने जास्तीत जास्त वेळ उमेदवारांना रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. असे असतानाही संरक्षणाच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समाजकल्याण आणि आदिवासी विभागातील जातपडताळणी कार्यालयाबाहेर दिसत आहे.
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जातपडताळणी समितीचे प्रमाणपत्र किंवा पडताळणीसाठी प्रकरण सादर केल्याची पावती अर्जासोबत जोडणे अपेक्षित आहे. त्यामुळे निदान प्रकरण दाखल करण्यासाठी या दोन्ही कार्यालयांमध्ये सकाळपासूनच गर्दी झाली आहे. केवळ कार्यालयातच नव्हे तर कार्यालयाच्या बाहेरही कार्यकर्त्यांची गर्दी झाली असल्याने जणू येथे कोरोना नाही, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. वास्तविक सर्वांनीच सुरक्षितता नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. परंतु, सामाजिक न्याय विभागात झालेल्या गर्दीवरून सुरक्षिततेची कुणालाही चिंता नसल्याचे दिसते.
--कोट---