कर्मचाऱ्यांवर अन्याय

By Admin | Published: December 3, 2015 10:12 PM2015-12-03T22:12:30+5:302015-12-03T22:14:11+5:30

मालेगाव : ग्रामशक्ती संघटनेने आयुक्तांकडे मागितली दाद

Injustice to the employees | कर्मचाऱ्यांवर अन्याय

कर्मचाऱ्यांवर अन्याय

googlenewsNext

मालेगाव : मालेगाव महानगरपालिकेच्या २०१०-१०११ मध्ये हद्दवाढीत महानगरपालिकेत समायोजित झालेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ग्रामशक्ती संघटनेतर्फे मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, मालेगाव महानगरपालिकेची २०१० मध्ये हद्दवाढ झाली. त्यात द्याने, म्हाळदे, भायगाव, सोयगाव या गावांचा समावेश करण्यात आला. सदर गावात कार्यरत असलेल्यांना महापालिकेत कायम करण्याचा कायदेशीर हक्क मनपा प्रशासनातर्फे डावलला जात आहे. सदर कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामशक्ती संघटनेतर्फे सोमवारी १४ डिसेंबरला एकदिवसीय धरणे आांदोलन करण्यात येणार आहे. असे पत्रकान्वये ग्रामशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. चंद्रशेखर देवरे, शहर संपर्कप्रमुख सुरेश पानपाटील, सलीम शेख, शशिकांत पवार यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Injustice to the employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.