भोजापूरच्या आवर्तनात पूर्व भागावर अन्याय होत असल्याची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 05:44 PM2018-11-27T17:44:20+5:302018-11-27T17:44:32+5:30
सिन्नर : पूर्व भागात दुष्काळाची भयानक स्थिती असतांना भोजापूर धरणातून फुलेनगर व दुशिंगपूर बंधाऱ्यामध्ये पाणी सोडले जात नाही. भोजापूर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत या परिसराचा विचार न करताच अधिकारी-लोकप्रतिनिधी यांनी पिण्यासह शेतीच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याचा निर्णयाला पूर्वभागातील ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप नोंदवला.
सिन्नर : पूर्व भागात दुष्काळाची भयानक स्थिती असतांना भोजापूर धरणातून फुलेनगर व दुशिंगपूर बंधाऱ्यामध्ये पाणी सोडले जात नाही. भोजापूर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत या परिसराचा विचार न करताच अधिकारी-लोकप्रतिनिधी यांनी पिण्यासह शेतीच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याचा निर्णयाला पूर्वभागातील ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप नोंदवला. या बंधाºयांमध्ये पाणी न सोडल्यास भोजापूर कालव्यात उपोषणाला बसण्याचा इशारा तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत वावी परिसरातील शेतकºयांनी दिला.
भोजापूरच्या पाण्यासह दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांचा चारा, निळवंडे कालवा प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पूर्व भागातील शेतकºयांनी सिन्नर-शिर्डी मार्गावर वावी येथे आठवडाभरापूर्वी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी तहसीलदार नितीन गवळी यांनी सर्व प्रश्नांसंदर्भात बैठक घेवून तोडगा काढण्याची ग्वाही दिली होती. या पार्श्वभूमीवर सोमवार (दि.२६) तहसीलदारांच्या दालनात पूर्व भागातील विशेषत: वावी परिसरातील शेतकºयांची व डावा कालवा चारी नं.४ च्या लाभक्षेत्रातील विविध गावांतील शेतकºयांची बठक पार पडली.
दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या पिण्यासाठी फुलेनगर, दुशिंगपूरचे बंधाºयात पाणी सोडण्याचा विचार न करताच आवर्तन सोडण्याचा निर्यणच कसा घेण्यात आला, असा संतप्त सवाल शेतकºयांनी उपस्थित केला. या बंधाºयासाठी पाण्याचे आरक्षण नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले. त्यामुळे दीड-दोन तास त्यावर चर्चा सुरू होती. शेवटी तहसीलदार गवळी यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत पाण्याच्या आरक्षणाबाबातचा स्वतंत्र प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्याचा शब्द दिला. त्यानंतर बैठक आटोपली.