मराठा समाजावर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:15 AM2021-05-06T04:15:38+5:302021-05-06T04:15:38+5:30
- हिरामण खोसकर, आमदार, इगतपुरी -------------------------- संपूर्ण मराठा समाज व युवक वर्ग हा या निकालाने नाराज झाला असून समाजाच्या ...
- हिरामण खोसकर, आमदार, इगतपुरी
--------------------------
संपूर्ण मराठा समाज व युवक वर्ग हा या निकालाने नाराज झाला असून समाजाच्या विकासाला व युवा पिढीच्या भवितव्याला ब्रेक लागणारा हा निकाल आहे. शेती कमी झाली, रोजगाराच्या दुसऱ्या संधी नसल्याने आर्थिक व सामाजिकदृष्ट्याही समाजात मागासलेपणा वाढत आहे. युवकांना शिक्षण असून नोकऱ्या नाहीत. केंद्र सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करून मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा
- उमेश खातळे , माजी तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी, इगतपुरी
-----------------------------
कायदेशीररित्या लोकशाही मार्गाने मराठा समाज अत्यंत शांत मार्गाने काळाची गरज म्हणून आरक्षण मागणी करीत होता. समाजातील सद्य परिस्थिती पाहता आज आरक्षणाची गरज आहे. न्यायालयानेही देशात जर एकच कायदा असेल तर इतर राज्यातील आरक्षण मर्यादेचा विचार केला पाहिजे.
- पांडुरंग वारुंगसे, माजी पंचायत समिती सभापती, इगतपुरी
----------------------------------
गेली चाळीस वर्षे सुरू असलेला मराठा समाजाचा संघर्ष राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयात शांत झाला. आरक्षणाअभावी मराठा समाजाच्या पिढ्या बरबाद झाल्या आहेत. आतातरी राज्य शासनाने यातून मार्ग काढताना राजकारण करू नये.
-- उदयकुमार आहेर, प्रदेशाध्यक्ष, शिवसंग्राम युवक आघाडी.